IPL 2026: विराट कोहलीचा ऑटोग्राफ मिळाला नाही, चिमुकला फॅन झाला निराश; रागाच्या भरात बॅट फेकली अन्...

IPL Viral Moments: आयपीएल २०२६ दरम्यान विराट कोहलीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हॉटेलमध्ये एन्ट्री करताना कानात इयरफोन्स असल्याने कदाचित विराटला एका चिमुकल्या फॅनचा आवाज ऐकू आला नाही, पण ऑटोग्राफ न मिळाल्याने या चिमुकल्याने निराश होऊन आपली बॅट खाली फेकून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 12:22 IST2026-04-28T12:15:18+5:302026-04-28T12:22:35+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026: Virat Kohli ignores little fans autograph request, heart-breaking viral video surfaces | IPL 2026: विराट कोहलीचा ऑटोग्राफ मिळाला नाही, चिमुकला फॅन झाला निराश; रागाच्या भरात बॅट फेकली अन्...

IPL 2026: विराट कोहलीचा ऑटोग्राफ मिळाला नाही, चिमुकला फॅन झाला निराश; रागाच्या भरात बॅट फेकली अन्...

आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे जगभरात चाहते आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत विराटची जादू कायम आहे. विराटच्या एका झलकसाठी लोक तासनतास वाट पाहतात. सध्या विराट कोहलीच्या एका चिमुकल्या फॅनचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. विराटच्या ऑटोग्राफसाठी हॉटेलबाहेर हा चिमुकला  ताटकळत उभा होता. परंतु, विराटचे त्याच्याकडे लक्ष गेले नाही आणि तो पुढे निघून गेला. मात्र, त्यामुळे चिमुकला निराश होतो आणि आपली बॅट फेकून दिली. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये दिसते की, एका हॉटेलबाहेर विराट कोहलीचे अनेक चाहते जमले आहेत. यामध्ये एक छोटा मुलगा हातात 'मिनिएचर बॅट' घेऊन विराटचा ऑटोग्राफ घेण्यासाठी अत्यंत उत्साहात उभा होता. जेव्हा विराट आपल्या सहकाऱ्यांसह हॉटेलमध्ये प्रवेश करू लागला, तेव्हा या चिमुकल्याने त्याला वारंवार हाक मारली. मात्र, विराटने कानात इयरफोन्स घातले असल्यामुळे त्याचे या मुलाकडे लक्ष गेले नाही आणि तो सरळ पुढे निघून गेला. आपला आवडत्या खेळाडूच्या इतक्या जवळ जाऊनही त्याचा ऑटोग्राफ मिळाला नाही, यामुळे तो चिमुकला निराश झाला. निराशेच्या भरात त्याने आपली बॅट फेकून दिली आणि तो ढसाढसा रडू लागला. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

चाहत्यांनी काय समजून घ्यावे?

हॉटेलमध्ये अनेकदा शेकडो चाहते आपल्या लाडक्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी जमलेले असतात. अशा वेळी खेळाडूंना बीसीसीआय आणि फ्रँचायझींचे प्रोटोकॉल्स पाळणे अनिवार्य असते. जर एखाद्या मोठ्या खेळाडूने एका चाहत्याला ऑटोग्राफ देण्यास सुरुवात केली, तर तिथे गर्दी होण्याची दाट शक्यता असते. यामुळे हॉटेलमधील शिस्त बिघडून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असते. शिवाय, हॉटेलमध्ये इतरही पाहुणे असतात, त्यांना त्रास होऊ नये आणि सुरक्षेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून 'नो सेल्फी, नो ऑटोग्राफ' या धोरणाचे पालन केले जाते.  तसेच खेळाडूंना चाहत्यांशी थेट संपर्क टाळण्याचा सल्ला दिला जातो.

विराट कोहलीची ऐतिहासिक कामगिरी

एकिकडे या व्हिडिओची चर्चा असतानाच, दुसरीकडे विराटने मैदानात आपली जादू कायम ठेवली आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात विराटने आयपीएल कारकिर्दीत ९००० धावा पूर्ण करण्याचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. आयपीएलच्या इतिहासात ९००० धावांचा टप्पा गाठणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याच्या या अभूतपूर्व कामगिरीमुळे क्रीडा विश्वातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. फलंदाजीतील सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर विराटने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की त्याला 'किंग कोहली' का म्हटले जाते.

Web Title : विराट कोहली ने ऑटोग्राफ नहीं दिया, छोटा प्रशंसक निराश।

Web Summary : विराट कोहली के एक छोटे प्रशंसक का दिल टूट गया जब क्रिकेटर ने होटल के बाहर ऑटोग्राफ मांगते हुए उसे नहीं देखा। निराशा से अभिभूत होकर बच्चे ने अपना बल्ला फेंक दिया और रोने लगा। कोहली ने 9000 आईपीएल रन बनाए, मैदान पर सफलता और प्रशंसकों के साथ बातचीत को संतुलित किया।

Web Title : Young fan heartbroken as Virat Kohli misses autograph request.

Web Summary : A young Virat Kohli fan was left heartbroken after the cricketer didn't notice him seeking an autograph outside a hotel. Overwhelmed with disappointment, the child threw his bat down and cried. Kohli achieved 9000 IPL runs, balancing on-field success with fan interactions.