Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील

ट्रेंड विंडोच्या माध्यमातून कोणत्या संघातील खेळाडू कोणत्या संघाकडे गेला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 15:44 IST

Open in App

IPL 2026 Trades And Transfers Full List Of Player Movements Updated : च्या मिनी लिलावाआधी ट्रेंड विंडोच्या माध्यमातून काही फ्रँचायझी संघांनी खेळाडूंच्या अदला-बदलीचा मोठा डाव खेळला आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने रवींद्र जडेजा आणि सॅम कुरेनच्या बदल्यात राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातून संजू सॅमसनला आपल्या संघात घेतले आहे. रवींद्र जडेजा ४ कोटी पगार  कपातीसह १४ कोटी रुपयांसह राजस्थानच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. दुसऱ्या बाजूला संजू सॅमसनला १८ कोटीसह चेन्नई सुपर किंग्जकडून मैदानात उतरेल.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

चर्चित डीलशिवाय ८ पैकी ६ खेळाडूंसाठी फ्रँचायझींनी कोट्यवधी मोजले 

राजस्थान रॉयल्सचा संघ इंग्लंडच्या ऑलराउंडर  सॅम करनला २.४ कोटींमध्ये आपल्या संघात घेतलं आहे. या चर्चित डीलशिवाय अन्य काही खेळाडूंचे संघ बदलले आहेत. संजू आणि जड्डूशिवाय ८ पैकी ६ खेळाडूंची डील कोट्यवधीत झाली आहे.  इथं एक नजर टाकुयात ट्रेंड विंडोच्या माध्यमातून कोणत्या संघातील खेळाडू कोणत्या संघाकडे गेला? त्या खेळाडूंसाठी किती रुपयांची डील फायनल झाली यासंदर्भातील सविस्तर माहिती

IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात

ट्रेड विंडोच्या माध्यमातून कोट्यवधींची डील झालेले खेळाडू 

  • मोहम्मद शमी - सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून लखनौ सुपर जाएंट्स संघात (१० कोटी)
  • नितीश राणा राजस्थान रॉयल्सच्या संघातून दिल्ली कॅपिटल्स (४.२ कोटी)
  • सॅम करन चेन्नई सुपर किंग्जच्या संघाकडून राजस्थान रॉयल्सच्या संघात (२.४ कोटी)
  • शेरफन रुदरफोर्ड गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्स (२.६ कोटी)
  • शार्दुल ठाकूर लखनौ सुपर जाएंट्समधून मुंबई इंडियन्स (२ कोटी)
  • डोनोव्हन फरेरा दिल्ली कॅपिटल्समधून राजस्थान रॉयल्स (१ कोटी)

अर्जुन तेंडुलकरसह दोन अनकॅप्ट खेळाडूंचाही समावेश 

  • मयंक मार्कंडे - कोलकाता नाईट रायडर्समधून मुंबई इंडियन्स (३० लाख)
  • अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या संघातून लखनौ सुपर जाएंट्स (३० लाख) 
English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026: Jadeja, Samson Highlight Multi-Million Player Trades

Web Summary : Ahead of IPL 2026, teams traded players, with Jadeja to Rajasthan for ₹14 crore and Samson to Chennai for ₹18 crore. Other significant trades include Mohammad Shami, Nitish Rana, and Sam Curran, totaling crores. Arjun Tendulkar also moved to Lucknow.
टॅग्स :आयपीएल २०२६इंडियन प्रीमिअर लीगरवींद्र जडेजासंजू सॅमसनराजस्थान रॉयल्सचेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्सलखनौ सुपर जायंट्स