IPL 2026 Trade Window : क्रिकेट जगतातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय स्पर्धा असलेल्या आयपीएल २०२६ स्पर्धसाठी डिसेंबरमध्ये मिनी लिलाव पार पडणार आहे. त्याआधी या स्पर्धेत सहभागी १० संघ रिटेन रिलीजच्या खेळाशिवाय ड्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडूंची अदलाबदलीचा डाव खेळतील. संजू सॅमसन ट्रेड विंडोच्या माध्यमातून CSK ताफ्यात सामील होईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहेत. त्यासंदर्भात आता एक मोठी माहिती समोर आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विकेट किपर बॅटर संजूच्या बदल्यात राजस्थान संघाची डील ठरणार 'रॉयल'?
ESPN क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, राजस्थान रॉयल्सचा संघ संजू सॅमसनला चेन्नई सुपर किंग्जकडे सोपवण्यास तयार आहे. पण त्याच्या बदल्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाने रवींद्र जडेजा आणि सॅम कुरेन या दोन अष्टपैलू खेळाडूंंना आपल्या ताफ्यात मागणी केली आहे. दोन्ही फ्रँचायझी संघाने यासंदर्भात अद्याप अधिकृत पुष्टी दिलेली नाही. पण जर ही डील फायनल झाली तर आयपीएलमधील हा एक मोठा ट्रेड ठरेल. गत हंगामात राजस्थानच्या संघानं १८ कोटींसह संजू सॅमसनला रिटेन केलं होते. दुसऱ्या बाजूला चेन्नईच्या संघाने जड्डूसाठी १८ कोटी मोजले होते. संजूच्या बदल्यात जड्डूसह सॅम करनही राजस्थानच्या ताफ्यात आला तर RR फ्रँचायझी संघाला इंग्लंडच्या मॅचविनर ऑलराउंडरच्या रुपात २.४ कोटींचा बोनस मिळेल.
CSK च्या ताफ्यातील प्रमुख खेळाडू राहिलाय जड्डू
रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसन दोन्ही खेळाडूंनी आपापल्या फ्रँचायझी संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. रवींद्र जडेजा हा २०१२ पासून चेन्नई सुपर किंग्स संघातील प्रमुख खेळाडू राहिला आहे. CSK च्या संघाने आतापर्यंत जिंकलेल्या ५ जेतेपदांपैकी ३ वेळा जड्डू या फ्रँचायझी संघाचा भाग राहिला आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने जड्डूकडे कॅप्टन्सीही दिली होती. पण काही सामन्यानंतर त्याने ही जबाबदारी सोडली. आता मात्र संजूच्या मागणीसमोर CSK जड्डूला ट्रेड टेबलवर आणण्याची तयारी दाखवत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
संजू सॅमसनही राजस्थानचा प्रमुख चेहरा, पण...
संजू सॅमसन हा टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू आहे. २०१८ पासून राजस्थान संघाकडून खेळणाऱ्या संजूकडे २०२१ मध्ये संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. त्याच्या नेृत्वाखाली राजस्थानच्या संघाने २०२२ च्या हंगामात फायनलही गाठली होती. आतापर्यंत आयपीएलमधील १७७ सामन्यात संजू सॅमसन याने ४७०४ धावा काढल्या आहेत. विकेट किपर बॅटरच्या रुपात संजू हा चेन्नई सुपर किंग्ससाठी हुकमी एक्का ठरू शकतो.