आयपीएल २०२५ स्पर्धेआधी राजस्थान रॉयल्सच्या गोठ्यातून मोठी बातमी समोर आली. संघाचा कर्णधार आणि यष्टीरक्षक संजू सॅमसनने राजस्थानच्या संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. संजू सॅमसननेराजस्थान रॉयल्स व्यवस्थापनाला आयपीएल २०२६ आधी त्याला रिलीज करण्याची विनंती केली आहे.
क्रिकबझच्या अहवालानुसार, संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्सच्या संघ व्यवस्थापनात बरेच मतभेद झाले आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, सॅमसनने स्वतःला लिलावात ठेवण्याची किंवा दुसऱ्या संघात स्थानांतरित करण्याची मागणी केली आहे. संजू सॅमसनचे कुटुंबीय देखील म्हणत आहेत की तो आता या संघासोबत खेळू इच्छित नाही. तसेच संमसनच्या जवळच्या खेळाडूंनी सॅमसन आणि राजस्थानच्या संघातील संबंध पूर्वीसारखे न राहिल्याचे म्हटले आहे.
आयपीएलच्या नियमानुसार, एखाद्या खेळाडूला लिलावात विकत घेण्यात आले किंवा संघात कायम ठेवण्यात आले. तर, तो पुढील तीन वर्षांसाठी फ्रँचायझीशी करारबद्ध राहतो. त्यामुळे त्या खेळाडूला संघात ठेवायचे की रिलीज करायचे? याचा निर्णय संघ व्यवस्थापन ठरवू शकतो. आयपीएल २०२५ च्या लिलावात राजस्थानने संजूला १८ कोटी रुपयांत संघात कायम ठेवले. त्यानुसार, तो २०२७ पर्यंत फ्रँचायझीशी करारबद्ध असेल.
संजू सॅमसनची आयपीएल कारकिर्दसंजू सॅमसनने आयपीएलमध्ये आतापर्यंत १७७ सामने खेळले आहेत आणि १३९ च्या स्ट्राइक रेटने ४ हजार ७०४ धावा केल्या आहेत, ज्यात तीन शतक आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे.