संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?

Sanju Samson: आयपीएल २०२५ स्पर्धेआधीच राजस्थान रॉयल्सच्या गोठ्यातून मोठी बातमी समोर आली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 18:45 IST2025-08-07T18:32:26+5:302025-08-07T18:45:32+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2026: Sanju Samson leaves Rajasthan Royals after serious differences with Rahul Dravid | संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?

संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएल २०२५ स्पर्धेआधी राजस्थान रॉयल्सच्या गोठ्यातून मोठी बातमी समोर आली. संघाचा कर्णधार आणि यष्टीरक्षक संजू सॅमसनने राजस्थानच्या संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. संजू सॅमसननेराजस्थान रॉयल्स व्यवस्थापनाला आयपीएल २०२६ आधी त्याला रिलीज करण्याची विनंती केली आहे. 

क्रिकबझच्या अहवालानुसार, संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्सच्या संघ व्यवस्थापनात बरेच मतभेद झाले आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, सॅमसनने स्वतःला लिलावात ठेवण्याची किंवा दुसऱ्या संघात स्थानांतरित करण्याची मागणी केली आहे. संजू सॅमसनचे कुटुंबीय देखील म्हणत आहेत की तो आता या संघासोबत खेळू इच्छित नाही. तसेच संमसनच्या जवळच्या खेळाडूंनी सॅमसन आणि राजस्थानच्या संघातील संबंध पूर्वीसारखे न राहिल्याचे म्हटले आहे.

आयपीएलच्या नियमानुसार, एखाद्या खेळाडूला लिलावात विकत घेण्यात आले किंवा संघात कायम ठेवण्यात आले. तर, तो पुढील तीन वर्षांसाठी फ्रँचायझीशी करारबद्ध राहतो. त्यामुळे त्या खेळाडूला संघात ठेवायचे की रिलीज करायचे? याचा निर्णय संघ व्यवस्थापन ठरवू शकतो. आयपीएल २०२५ च्या लिलावात राजस्थानने संजूला १८ कोटी रुपयांत संघात कायम ठेवले. त्यानुसार, तो २०२७ पर्यंत फ्रँचायझीशी करारबद्ध असेल. 

संजू सॅमसनची आयपीएल कारकिर्द
संजू सॅमसनने आयपीएलमध्ये आतापर्यंत १७७ सामने खेळले आहेत आणि १३९ च्या स्ट्राइक रेटने ४ हजार ७०४ धावा केल्या आहेत, ज्यात तीन शतक आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे.

Web Title: IPL 2026: Sanju Samson leaves Rajasthan Royals after serious differences with Rahul Dravid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.