Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026 : पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकायला १८ वर्षे लागली! आता RCB ला खुणावतोय CSK अन् MI चा महारेकॉर्ड

१८ वर्षांच्या इतिहासात फक्त दोन संघांनी केलाय हा पराक्रम, RCB ते करून दाखवणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 21:55 IST

Open in App

IPL 2026 RCB Has Big Task To Defend IPL Title : इंडियन प्रीमियर लीगच्या  १९ व्या हंगामाला २८ मार्चपासून सुरुवात होत आहे. गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या लढतीनं यंदाच्या हंगामाच्या आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. सलामीच्या लढतीत धमाकेदार सुरुवात करत RCB संघ गत हंगामातील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्याने यंदाचा हंगाम गाजवण्यासाठी प्रयत्नशील असेल. पहिली वहिली IPL ट्रॉफी जिंकण्यासाठी १८ वर्षे प्रतीक्षा करणाऱ्या आरसीबीच्या संघाला यंदाच्या हंगामात CSK आणि MI च्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी असेल. इथं जाणून घेऊयात त्यासंदर्भातील खास माहिती 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

१८ वर्षांच्या इतिहासात फक्त दोन संघांनी केलाय हा पराक्रम, RCB ते करून दाखवणार का?

आयपीएलच्या आतापर्यंतच्या  १८ वर्षांच्या इतिहासात फक्त दोन संघांनी IPL जेतेपदाचा यशस्वीरित्या बचाव करत सलग दोन वेळा ट्रॉफी उंचावण्याचा पराक्रम करून दाखवला आहे. ज्या दोन संघांनी ही कामगिरी करून दाखवली आहे त्यात MI आणि CSK या पाच वेळच्या IPL चॅम्पियन संघांचा समावेश आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली RCB चा संघ हा महापराक्रम करून दाखवणार का? याकडे सर्वांच्या नजरा असतील. विराट कोहली सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये असून जर त्याची बॅट तळपली तर आरसीबीचा संघ हा डाव निश्चितच साधू शकेल. 

RCB ला धक्का! श्रीलंकन क्रिकेट बोर्डानं ‘या’ स्पीडस्टारला IPL खेळण्याची परवानगी नाकारली; कारण..

चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने सर्वात आधी साधला होता सलग दुहेरी जेतेपदाचा डाव

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा संघ काही हंगाम सोडले तर सातत्यपूर्ण जेतेपदाचा प्रबळ दावेदार राहिला आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली पाच वेळा जेतेपद पटकावणाऱ्या CSK च्या संघाने पहिल्यांदा जेतेपदाचा बचाव करण्याचा डाव साधला होता. २०१० मध्ये पहिली ट्रॉफी उंचावल्यावर २०११ मध्येही चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने सलग दुसरे जेतेपद पटकावले होते.  

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची कमाल

मुंबई इंडियन्सच्या संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील सलग पाच वेळा IPL जेतेपद पटकावले आहे. सर्वात आधी पाच जेतेपद मिळवणाऱ्या MI नं  २०१९ मध्ये चौथ्यांदा जेतेपद पटकावले होते. २०२० च्या हंगामात सर्वाधिक पाचव्यादा ही स्पर्धा जिंकत मुंबई इंडिन्सच्या संघाने जेतेपदाचा बचाव करण्याचा डाव साधला होता.  

English
हिंदी सारांश
Web Title : RCB eyes CSK, MI record after 18 years for first IPL win.

Web Summary : RCB aims to replicate CSK and MI's consecutive IPL title wins after struggling for 18 years. Kohli's form is key to their success in the upcoming season.
टॅग्स :आयपीएल २०२६रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सआयपीएल २०२४इंडियन प्रीमिअर लीगबीसीसीआयटी-20 क्रिकेट