IPL 2026 Points Table After MI vs CSK Match Result : आयपीएलमधील एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि प्रत्येकी पाच वेळा ट्रॉफी उंचावलेल्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना रोमहर्षक होईल, अशी अपेक्षा होती. पण वानखेडेच्या मैदानात चेन्नईकरांनी १०३ धावांच्या फरकाने IPL च्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला. कमालीचा योगायोग हा की, मुंबई इंडियन्ससाठी हा पराभव लाजिरवाणा ठरला. कारण IPL च्या आतापर्यंतच्या इतिहासात MI च्या संघानं कधीच शंभरपेक्षा अधिक धावांनी सामना गमावला नव्हता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
CSK ची टॉप ५ मध्ये एन्ट्री, MI आठव्या स्थानावर
संजूच्या कमालीच्या फॉर्मसह कमालीच्या गोलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सचा संघ एक्स्प्रेसच्या वेगानं गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. दुसरीकडे या पराभवामुळे MI चा संघ आठव्या स्थानी असून प्लेऑफ्सचा त्याचा मार्ग खडतर झाला आहे. इथं नजर टाकुयात MI vs CSK यांच्यातील लढतीनंतर गुणतालिकेत कोणता संघ कितव्या स्थानी आहे? त्यासंदर्भातील सविस्तर...
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्...पंजाबचा संघ अव्वल, त्यांच्या पाठोपाठ लागतो RR, RCB अन् काव्याच्या SRH चा नंबर
पंजाब किंग्स हा सहा सामन्यानंतर अपराजित राहणारा आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील पहिला संघ ठरला आहे. ६ पैकी पाच विजय आणि एका अनिर्णित सामन्यासह ११ गुणांची कमाई करत श्रेयस अय्यरचा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानवर आहे. राजस्थान रॉयल्सने ७ सामन्यातील ५ विजय आणि २ पराभवासह १० गुण कमावले असून ते दुसऱ्या स्थानावर आहेत. आरसीबीच्या संघाने ६ पैकी ४ सामन्यातील विजय आणि २ पराभवासह ८ गुणांसह तिसऱ्या तर सनरायझर्स हैदराबाद ७ सामन्यातील ४ विजय आणि ३ पराभवासह ८ गुणांच्या कमाईसह चौथ्या स्थानावर आहे.
३ संघांच्या खात्यात ६ गुण! पण त्यात CSK भारी
चेन्नई सुपर किंग्सने ७ सामन्यातील ३ विजय आणि ४ पराभवासह ६ गुणांची कमाई केली आहे. याशिवाय दिल्ली कॅपिट्लस आणि गुजरात टायटन्स यांनीही ६ सामन्यातील ३ विजय आणि ३ पराभवासह ६ गुणांपर्यंत मजल मारली आहे. पण मुंबई इंडियन्सविरुद्ध १०३ धावांच्या मोठ्या विजयासह उत्तम धावगतीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांना मागे टाकत टॉप ५ मध्ये पोहचला आहे.
MI सह तळातील ३ संघांचा प्लेऑप्सचा मार्ग खडतर
मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जाएंट्स यांनी ७ सामन्यानंतर फक्त २ विजयासह ४ गुणांची कमाई केली आहे. याशिवाय तळाला असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने ७ पैकी १ विजय आणि एका अनिर्णित सामन्यासह ३ गुण कमावले आहेत. IPL प्लेऑफ्स गाठण्यासाठी किमान १६ गुण कमावणे गरजेचे असते. यासाठी तळाच्या तिन्ही संघासाठी आता प्रत्येक सामना महत्त्वपूर्ण असेल. MI आणि LSG चा संघ उर्वरित ७ सामन्यात एक पराभव माफ असेल. पण त्यात आणखी एका पराभवाची भर पडली तर प्लेऑफ्सच्या शर्यतीतून ते आउट होतील. कोलकाताला तर एका पराभवाचीही मोठी किंमत चुकवावी लागू शकते.
Web Summary : CSK's massive win propels them into the top 5, while MI's playoff hopes dwindle after a humiliating defeat. Punjab leads, followed by RR, RCB, and SRH. Bottom teams face a tough road to qualify.
Web Summary : CSK की बड़ी जीत से वह टॉप 5 में, MI की हार से प्लेऑफ की उम्मीदें कम हुईं। पंजाब सबसे ऊपर, RR, RCB, SRH पीछे। नीचे की टीमों के लिए मुश्किल राह।