Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026 Points Table: LSG पाठोपाठ MI चं आव्हान संपलं; DC वर टांगती तलवार, ७ संघ अजूनही स्वबळावर लढणार

आता ८ संघापैकी कोणते ४ संघ प्लेऑफ्सचं तिकीट पक्के करणार याची चर्चा रंगू लागली आहे. 

By सुशांत जाधव | Updated: May 11, 2026 11:25 IST

Open in App

IPL 2026 Points Table  And   Playoffs Race :आयपीएल २०२६ स्पर्धेतील रविवारी झालेल्या डबल हेडर लढतीनंतर यंदाच्या हंगामातील दोन संघाचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने लखनौ सुपर जाएंट्सला पराभूत करत त्यांना स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने रायपूरच्या मैदानातील रोमहर्षक लढतीत बाजी मारत मुंबई इंडियन्सचा खेळ खल्लास केला. आता ८ संघापैकी कोणते ४ संघ प्लेऑफ्सचं तिकीट पक्के करणार याची चर्चा रंगू लागली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

आता या संघावर आहे स्पर्धेबाहेर पडण्याची टांगती तलवार 


सोमवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील लढतीत एका संघावर स्पर्धेतून बाहेर होण्याची टांगती तलवार असेल. दिल्ली कॅपिटल्सचा संघ ११ सामन्यानंतर ४ विजय आणि ७ पराभवासह ८ गुणांची कमाई करुन गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. सर्वच्या सर्व सामने जिंकले तरी ते १४ गुणांपर्यंत पोहचू शकतात. जरी त्यांनी हा डाव साधला तरी उर्वरित संघाच्या निकालावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल. त्यामुळे या संघावर स्पर्धेबाहेर पडण्याची टांगती तलवार आहे. पंजाबशिवाय ते राजस्थान आणि कोलकाता विरुद्ध सामना खेळणार आहेत.   

RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"

आघाडीच्या तीन संघांसाठी प्लेऑफ्सचा पेपर सोपा   

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने ११ सामन्यानंतर ७ विजय आणि ४ पराभवासह १४ गुणांची कमाई करत उत्तम निव्वळ धावगतीच्या जोरावर (+१.१०३) अव्वलस्थानी झेप घेतली आहे. त्यापाठोपाठ सनरायझर्स हैदराबादचा संघ 
११ सामन्यातील ७ विजयासह १४ गुणांची कमाई करत (निव्वळ धावगती +०.३३७) दुसऱ्या तर गुजरात टायटन्सचा संघ ११ पैकी ७ विजयासह १४ गुण खात्यात जमा करत (निव्वळ धावगती +०.२२८) तिसऱ्या स्थानावर आहे. या तीन संघांना उर्वरित ३ पैकी फक्त एक सामना जिंकून प्लेऑफ्सचा तिकीट पक्के करणे सहज शक्य आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी प्लेऑफ्सचा पेपर अगदी सोपा आहे. 

या ४ संघामध्ये तगडी स्पर्धा 

पंजाब किंग्सच्या संघाने ११ पैकी ६ विजय आणि एका अनिर्णित सामन्यासह १३ गुण मिळवले असून त्यांना उर्वरित ४ पैकी किमान दोन सामने जिंकून आघाडीच्या चारमधील आपले स्थान कायम राखता येईल. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ ११ पैकी ६ विजयासह १२ गुणांची कमाई करत अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानवर आहे.  हे दोन्ही संघ आपले उर्वरित सर्व सामने जिंकून  १८ गुणांपर्यंत पोहचू शकतात. याशिवाय कोलकाता नाईट रायडर्सने १० पैकी ४ विजय आणि एका अनिर्णित सामन्यासह ९ गुण कमावले असून त्यांना सर्व सामने जिंकून १७ गुणांपर्यंत मजल मारता येऊ शकते. त्यामुळे पंजाब किंग्स, चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील प्लेऑफ्ससाठी तगडी स्पर्धा पाहायला मिळेल. 

गुणतालिकेत कोण कितव्या स्थानी?

  • RCB – ११ सामने, ७विजय, ४ पराभव  १४ गुण, निव्वळ धावगती +१.१०३
  • SRH – ११ सामने, ७ विजय, ४ पराभव, १४ गुण, निव्वळ धावगती +०.७३७
  • GT – ११ सामने, ७ विजय, ४ पराभव, १४ गुण, निव्वळ धावगती +०.२२८
  • PBKS – १० सामने, ६ विजय, ३ पराभव, एक सामना अनिर्णित, १३ गुण, निव्वळ धावगती +०.५७१
  • CSK – ११ सामने, ६ विजय, ५ पराभव,  १२ गुण, निव्वळ धावगती +०.१८५
  • RR – ११ सामने, ६ विजय, ५ पराभव, १२ गुण, निव्वळ धावगती +०.०८२
  • KKR – १० सामने, ४ विजय, ५ पराभव, ९ गुण, निव्वळ धावगती -०.१६९
  • DC – ११  सामने, ४ विजय, ७ पराभव,  ८ गुण, निव्वळ धावगती -१.१५४
  • MI - स्पर्धेतून बाहेर
  • LSG- स्पर्धेतून बाहेर
     
English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026: LSG, MI out; Seven teams vie for playoffs.

Web Summary : LSG and MI are out of IPL 2026. RCB, SRH, and GT have an easy path to playoffs. PBKS, CSK, RR, and KKR face tough competition for the remaining spots. DC faces elimination threat.
टॅग्स :आयपीएल २०२६रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसनरायझर्स हैदराबादगुजरात टायटन्सपंजाब किंग्सचेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्सराजस्थान रॉयल्सदिल्ली कॅपिटल्सलखनौ सुपर जायंट्समुंबई इंडियन्स