IPL 2026 Points Table After MI vs RCB Match : आयपीएल २०२६ स्पर्धेतील यंदाच्या हंगामातील पहिल्या दोन आठवड्यात राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स हे चा संघ गुणतालिकेत अव्वल चारमध्ये आहेत. याउलट IPL मधील सर्वात लोकप्रिय आणि पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यासह तीन वेळच्या चॅम्पिन कोलकाता नाईट रायडर्सची अवस्था अगदी बिकट अल्याचे दिसून येते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
RCB टॉप ३ मध्ये पोहचली, MI तळातून तिसऱ्या स्थानी
रविवारी मुंबईतील वानखेडच्या मैदानात मुंबई इंडियन् विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स यांच्यात स्पर्धेतील २० वा सामना खेळवण्यात आला. या लढतीतील दिमाखदार विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ ४ सामन्यातील ३ विजयासह ६ गुणांची कमाई करत तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या संघाला ४ सामन्यातील १ विजय आणि ३ पराभवासह आठव्या स्थानावर आहे. इथं एक नजर टाकुयात MI विरुद्ध RCB यांच्यातील लढतीनंतर IPL 2026 स्पर्धेतील गुणतालिकेत कोणता संघ कितव्या स्थानी आहे त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; नेमकं काय घडलं?
RR ची 'रॉयल' कामगिरी; त्यापाठोपाठ लागतो PBKS अन् RCB चा नंबर
रियान परागच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सच्या संघाने सलग ४ सामन्यातील विजयासह यंदाच्या हंगामा आपला दबदबा राखला आहे. त्यांनी ८ गुण आपल्या खात्यात जमा केले असून इतर संघाच्या तुलनेत त्यांची निव्वळ धावगतीही जबरदस्त आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सच्या संघाने ४ सामन्यात ३ विजय आणि एका अनिर्णित सामन्यात मिळालेल्या एका गुणासह ७ गुण कमावत या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धचा सामना १८ धावांनी जिंकत RCB चा संघ ४ सामन्यात १ पराभव आणि ३ विजयासह ६ गुणांची कमाई करत तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने ४ सामन्यातील २ विजय आणि २ पराभवासह ४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
IPL मधील सर्वात यशस्वी संघ MI आणि CSK सह KKR तळागाळात
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सच्या संघाने पहिल्या ४ सामन्यातील २ विजय आणि दोन पराभवासह ४ गुणांची कमाई केली आहे. लखनौच्या संघानेही ४ सामन्यानंतर २ गुण कमावले असून नेटरनरेच्या जोरावर हे दोन्ही संघ अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांनी ४ सामन्यानंतर फक्त एक विजय मिळवला असून हे संघ अनुक्रमे सातव्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहेत.