'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा

पंजाब किंग्सच्या संघाने दोनशे पारची लढाई सर्वाधिक वेळा जिंकण्याचा आपला विक्रम आणखी भक्कम केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 19:16 IST2026-04-11T19:13:05+5:302026-04-11T19:16:27+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 PBKS vs SRH Punjab Kings Won By 6 Wkts Against Sunrisers Hyderabad Shreyas Iyer Priyansh Arya Prabhsimran Singh Shine With Fifty | 'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा

'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा

IPL 2026 PBKS vs SRH Punjab Kings Won By 6 Wkts Against Sunrisers Hyderabad : प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांच्या सुपर हिट शोनंतर 'सरपंच साब' श्रेयस अय्यरच्या कडक अर्धशतकाच्या जोरावर पंजाब किंग्सच्या संघाने न्यू चंडीगडच्या मुल्लानपूर स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादला पराभूत केले. पहिल्यांदा फलंदाजी करताना अभिषेक शर्मा आणि ट्रॅविस हेडच्या तुफान फटकेबाजीशिवाय क्लासेनच्या क्लास फलंदाजीच्या जोरावर हैदराबादच्या संघाने निर्धारित २० षटकात ६ बाद २१९ धावा करत पंजाबसमोर २२० धावांचे टार्गेट  सेट केले होते. या धावांचा यशस्वी पाठलाग करत पंजाब किंग्सच्या संघाने दोनशे पारची लढाई सर्वाधिक वेळा जिंकण्याचा आपला विक्रम आणखी भक्कम केला. पंजाब किंग्सच्या संघाने १० व्यांदा २०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करुन दाखवला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

प्रियांश-प्रभसिमरन यांच्यासह कर्णधार श्रेयस अय्यरचे नाबाद अर्धशतक

सनरायझर्स हैदराबादच्या संघाने दिलेल्या २२० धावांचा पाठलाग करताना प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग या सलामी जोडीनं पंजाबच्या संघाला दमदार सुरुवात करून दिली. प्रियांशने ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने २० चेंडूत ५७ धावा केल्या. दुसऱ्या बाजूला प्रभसिमरन सिंग याने २५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५१ धावांची दमदार खेळी साकारली. या दोघांनाही शिवांग कुमारनं तंबूचा रस्ता दाखवला. कूपर कॉलॉनी अवघ्या ११ धावा करून परतल्यावर श्रेयस अय्यरनं सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने ३३ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ६९ धावा करत संघाचा तिसरा विजय निश्चित केला. 

IPL 2026 Rising Stars : मुकुल चौधरी ते प्रशांत वीर! एका रात्रीत स्टार झाले 'हे' ५ युवा क्रिकेटर्स

अभिषेक शर्मासह ट्रॅविस हेडची धमाकेदार खेळी, पण...

पहिल्यांदा फलंदाजी करताना अभिषेक शर्मा आणि ट्रॅविस हेड यांनी धमाकेदार सुरुवात करून देत पॉवर प्लेमध्ये १०५ धावा कुटल्या. अभिषेक शर्मा २८ चेंडूत ७४ धावा आणि ट्रॅविस हेडने २३ चेंडूत ३८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शशाक सिंह याने या दोघांची विकेट घेतल्यावर सनरायझऱ्स हैदराबादच्या संघाला धावगती मंदावली. हॅन्री क्लासेन याच्या ३३ चेंडूतील ३९ धावांसह  ईशान किशन २७ (१७) आणि अनिकेत वर्मा १८ (९) यांनी केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादच्या संघाने निर्धारित २० षटकात २०१९ धावांपर्यंत मजल मारली. पण शेवटी या धावा कमीच पडल्या. पंजाब किंग्सच्या संघाने ६ विकेट्स आणि ७ चेंडू राखून सहज विजय नोंदवला. 

Web Title : पंजाब किंग्स की जीत: अय्यर की तूफानी पारी से सनराइजर्स हैदराबाद परास्त

Web Summary : पंजाब किंग्स ने सनराइजर्स हैदराबाद को 220 रनों का पीछा करते हुए हराया। प्रियांश और प्रभसिमरन की विस्फोटक शुरुआत और श्रेयस अय्यर के नाबाद 69 रनों ने जीत सुनिश्चित की। पहले, अभिषेक शर्मा और ट्रैविस हेड हैदराबाद के लिए चमके, लेकिन पंजाब की मजबूत बल्लेबाजी लाइनअप हावी रही।

Web Title : Punjab Kings Triumph: Iyer's Blitz Downs Sunrisers Hyderabad in Thrilling Chase

Web Summary : Punjab Kings defeated Sunrisers Hyderabad, chasing down 220. Priyansh and Prabhsimran's explosive start, followed by Shreyas Iyer's unbeaten 69, secured the victory. Earlier, Abhishek Sharma and Travis Head shone for Hyderabad, but Punjab's strong batting lineup prevailed, marking their tenth 200+ run chase.