Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026 MI vs KKR Match Live Streaming : मुंबई इंडियन्सची हवा; कोलकाता नाईट रायडर्स चमत्कार दाखवणार?

MI यंदाच्या हंगामात जेतेपदाचा षटकार मारेल अशी अपेक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 05:30 IST

Open in App

IPL 2026 MI vs KKR Match Live Streaming  : आयपीएल २०२६ च्या १९ व्या हंगामात मुंबई इंडियन्सचा संघ वानखेडेच्या घरच्या मैदानात रंगणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या लढतीनं यंदाच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. गत हंगामात दुसऱ्या क्वालिफायरमधून स्पर्धेबाहेर पडलेला मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या हंगामातील जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

MI यंदाच्या हंगामात जेतेपदाचा षटकार मारेल अशी अपेक्षा 

कर्णधार हार्दिक पांड्यासह माजी कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा यांच्यात कमालीचा ताळमेळ दिसून येतोय. टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन करणारा सूर्यकुमार यादवही याच संघाचा भाग असून जगातील सर्वात्तम गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे यंदा मुंबई इंडियन्स जेतेपदाचा षटकार मारेल, अशी अपेक्षा आहे. दुसऱ्या बाजूला KKR चं नेतृत्व हे मुंबईकर अजिंक्य राहणेच्या खांद्यावर आहे. गत हंगामात KKR ची कामगिरी सुमार राहिली  होती. त्यात MI समोर त्यांचा रेकॉर्डही बरा नाही.  त्यामुळे पुन्हा मुंबई हवा करणार की, कोलकाता नाईट रायडर्स चमत्कार दाखवणार? ते पाहण्याजोगे असेल. इथं एक नजर टाकुयात MI विरुद्ध KKR यांच्यातील सामना कधी अन् कुठे रंगणार? कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड यासंदर्भातील सविस्तर माहिती

RCB vs SRH : क्लासेनच्या विकेटवरून वाद! मग शानदार कॅच घेत ईशानच्या शतकाआड आला फिल सॉल्ट (VIDEO)

MI ची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, अश्वनी कुमार, ट्रेंट बोल्ट

KKR ची संभाव्या प्लेइंग इलेव्हन  

टिम सिफर्ट, फिन अ‍ॅलन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, कॅमरून ग्रीन, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, सुनील नरेन, वैभव अरोरा, उमरान मलिक, वरुण चक्रवर्ती.

कसा आहे दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड

  • खेळलेले सामने: ३५
  • मुंबई इंडियन्सने  २४ सामन्यात मिळवलाय विजय
  • कोलकाता नाईट रायडर्सने  ११ सामन्यात मारलीये बाजी

वानखेडेची खेळपट्टी कुणाला देईल साथ? 

मुंबईतील वानखेडेची खेळपट्टी ही फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. पण टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत काही सामन्यात या मैदानावर फलंदाजांचा कस लागल्याचे पाहायला मिळाले आहे. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघातील फलंदाज या मैदानात संघर्ष करताना दिसले होते. पण त्यानंतर याच मैदानात भारत-इंग्लंड यांच्यातील धावांची बरसात झाली होती. IPL मध्ये या मैदानात फलंदाजांना मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे.

कधी कुठं रंगणार सामना? या सामन्याचा आनंद कसा घेता येईल?

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना मुंबईतील वानखेडेच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. रविवारी २९ मार्चला भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी या लढतीला सुरुवात होईल. या सामन्याचे थेट प्रेक्षपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर करण्यात येणार आहे. याशिवाय जिओ हॉटस्टार अ‍ॅप आणि वेबसाईटवर लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेता येईल.

English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026: MI vs KKR – Who will dominate Mumbai's field?

Web Summary : Mumbai Indians start their IPL 2026 campaign against KKR at Wankhede. MI, led by Hardik Pandya, aims for their sixth title, boosted by Rohit Sharma, Suryakumar Yadav, and Jasprit Bumrah. KKR, under Ajinkya Rahane, seeks to improve their record against MI. The match is on March 29th.
टॅग्स :आयपीएल २०२६मुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्सहार्दिक पांड्याअजिंक्य रहाणेरोहित शर्मासूर्यकुमार यादवजसप्रित बुमराह