IPL 2026 Mahela Jayawardene On Suryakumar Yadav And Impact Player Plan : पाचवेळचा IPL चॅम्पियन संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने वानखेडेच्या मैदानातून यंदाच्या हंगामात विजयी सलामी दिली. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात MI नं १३ वर्षांची पराभवाची मालिका खंडीत करत मोहिमची सुरुवात दिमाखात केली आहे. पण या सामन्यानंतर भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवसंदर्भात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सूर्याला MI च्या प्लेइंग इलेव्हमध्ये जागाच मिळणार नाही का?
पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव MI संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. तो इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात खेळताना दिसून आले. यंदाच्या हंगामात टी-२० वर्ल्ड कप चॅम्पियन याच भूमिकेत दिसणार का? पुढच्या सामन्यातही त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरच ठेवण्यात येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर मुंबई इंडियन्स संघाचे प्रशिक्षक महिला जयवर्धने यांनी संघ व्यवस्थापनाची भूमिका स्पष्ट केली आहे.
वानखेडे स्टेडियमवर फुलली Love Story! फिल्मी स्टाईल प्रपोज अन् IPL मधील 'मिस्ट्री कपल’ची प्रेमाची मिठी व्हायरल
गत हंगामात रोहितवर आली होती अशी वेळ
गत हंगामात MI च्या ताफ्यात रोहित शर्माला इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात खेळवण्याचा प्लॅन शिजला होता. कमालीचा योगायोग म्हणजे सूर्याप्रमाणे त्यावेळी रोहित शर्माही भारताच्या वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार होता. त्यामुळे आता तोच पॅटर्न आजमावण्यात यणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.
पहिल्या सामन्यात सूर्या प्लेइंग इलेव्हमध्ये का नव्हता?
सूर्यकुमार यादवसंदर्भात मुंबई इंडियन्सचे हेड कोच महेला जयवर्धने यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात सूर्या हा किरकोळ दुखापतीमुळे त्रस्त होता. क्षेत्ररक्षणाच्या वेळी विश्रांती मिळावी, या हेतूने त्या इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात आजमावण्यात आले, असे सांगत पुढच्या सामन्यात ती वेळ येणार नाही, असे प्रशिक्षकांनी स्पष्ट केले.
महेला जयवर्धने नेमकं काय म्हणाले?
गत हंगामात रोहित शर्माला ज्याप्रमाणे इम्पॅक्ट सबच्या रुपात वापरण्यात आले तशीच भूमिका यंदा सूर्याची असेल का? असा प्रश्न जयवर्धने यांना विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, तो दुखापतग्रस्त असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. आशा आहे की, कोणत्याही प्रकारची चुकीची गोष्ट पसरवली जाणार नाही. त्याला अतिरिक्त विश्रांती देण्यात आली होती, जी त्याला हवी होती.पुढील सामन्यापर्यंत आमच्याकडे पाच दिवस आहेत, त्यामुळे मला त्याला अतिरिक्त वेळ द्यायचा होता. तो तीन-चार ओव्हर फील्डिंगसाठी तयार होता पण मीच त्याला विश्रांती घेण्यास सांगितले, असे महेला जयवर्धने यांनी म्हटले आहे.
MI चा पुढचा सामना कधी?
मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या हंगामातील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळणार आहे. शनिवारी दुपारच्या सत्रात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघसमोरासमोर येतील. या सामन्यात सूर्यकुमार यादव प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल, असे संकेतच महेला जयवर्धने यांनी दिले आहेत.