Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली

९ डावानंतर सूर्याच्या भात्यातून आली अर्धशतकी खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 17:23 IST2026-04-04T17:23:02+5:302026-04-04T17:23:33+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 DC vs MI Suryakumar Yadav Falls To Lungi Ngidi Shortly After recording His 30th IPL Fifty | Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली

Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली

IPL  2026 स्पर्धेतील दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या जागी कॅप्टन्सीची जबाबदारी खांद्यावर पडलेल्या सूर्यकुमार यादवनं संकटात सापडलेल्या मुंबई इंडियन्सला सावरणारी खेळी केली. अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सच्या संघाने सलामीवीर रायन रिकल्टन आणि तिलक वर्माच्या रुपात अवघ्या १८ धावांवर दोन विकेट्स गमावल्या. संघ अडचणीत असताना सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा जोडी जमली. रोहित शर्माला अक्षर पटेल याने ३५ धावांवर चालते केल्यावर सूर्यानं अर्धशतक साजरे केले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

अर्धशतकानंतर तो पुढच्याच चेंडूवरच फसला!
 

सूर्यकमार यादवनं ३६ चेंडूत ३ चौकार आणि २ षटारांच्या मदतीने ५१ धावांची खेळी साकारली. आयपीएल कारकिर्दीतील ३० वे अर्धशतक झळकावल्यावर अखेरच्या षटकापर्यंत मैदानात थांबून तो दिल्ली कॅपिटल्ससमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारणारी खेळी करेल, असे वाटत होते. पण चौकाराने अर्धशतकाला गवसणी घातल्यावर लुंगी एनिगडीच्या १६ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर तो पायचित झाला. त्याच्या खेळीला लागलेला ब्रेक हा MI साठी एक मोठा धक्काच होता. 

DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण

९ डावानंतर अर्धशतकी खेळी

हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव तिसऱ्यांदा MI चं नेतृत्व करताना दिसला. याआधी दोन सामन्यात त्याने MI चं नेतृत्व केले असून १ विजय आणि एक पराभव असा त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड आहे. मागील ९ डावानंतर त्याच्या भात्यातून अर्धशतक  पाहायला मिळाले. याआधी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अमेरिकेविरुद्ध त्याने अर्धशतक झळकावले होते. या खेळीनंतर सातत्याने तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. मात्र आता IPL च्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात त्याने आपल्या बॅटिंगची खास झलक दाखवून दिली. 

 

Web Title : सूर्यकुमार यादव का अर्धशतक: मुंबई इंडियंस की कप्तानी उम्मीद टीम संघर्ष के बीच चमकी

Web Summary : सूर्यकुमार यादव के अर्धशतक ने दिल्ली कैपिटल्स के खिलाफ मुंबई इंडियंस को संभाला। हार्दिक पांड्या की अनुपस्थिति में नेतृत्व करते हुए, यादव के 36 गेंदों में 51 रनों ने नौ पारियों के बाद उनका पहला आईपीएल अर्धशतक बनाया। उनके प्रयासों के बावजूद, एमआई को प्रतिस्पर्धी स्कोर बनाने में चुनौतियों का सामना करना पड़ा।

Web Title : Suryakumar Yadav's Fifty: MI's Captaincy Hope Shines Amidst Team Struggles

Web Summary : Suryakumar Yadav's fifty steadied Mumbai Indians against Delhi Capitals after an early collapse. Leading due to Hardik Pandya's absence, Yadav's 51 off 36 balls marked his first IPL fifty after nine innings. Despite his efforts, MI faced challenges posting a competitive total.