IPL 2026, CSK vs SRH Heinrich Klaasen loses his temper after Sanju Samson Stumping : चेन्नई येथील चेपॉकच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्सने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना हेन्रिक क्लासेन याने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीतील क्लास दाखवला. तो संघासाठी डोकेदुखी ठरत असताना संजू सॅमसन याने यष्टीमागे डोळ्याची पापणी लवण्याच्या आत अगदी महेंद्रसिंह धोनीच्या अंदाजात त्याचा खेळ खल्लास केला. विकेट किपर आणि बॅटर यांच्यात तू- तू मै मै!.. क्षण पाहायला मिळाला. शिवम दुबे याने दोघांच्यातील वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने दिलेल्या १८१ धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादच्या संघाची सुरुवात खराब झाली. संघाच्या धावफलकावर ५६ धावा असताना दोन्ही सलामीवीर माघारी फिरले होते. संघ अडचणीत असताना हेन्रिक क्लासेन याने ईशान किशनच्या साथीनं डाव सावरला. तिसऱ्या विकेटसाठी या दोघांनी ४१ चेंडूत ७५ धावांची भागीदारी रचत चेन्नई सुपर किंग्सला बॅकफूटवर ढकलले. क्लासेन अर्धशतकाच्या अगदी जवळ असताना नूर अहमदने त्याला चकवा दिला. यष्टीमागे संजूनं चपळाईनं स्टंपवरील बेल्स उडवल्या. त्याच्या खेळीला ४७ धावांवर ब्रेक लागला. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच तो फिरकीपटूच्या गोलंदाजीवर बाद झाला.
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
संजूचं आक्रमक सेलिब्रेशन, मग क्लासेनचा पारा चढला
सेट झालेल्या क्लासेनला तंबूचा रस्ता दाखवल्यावर संजू सॅमसन याने आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन केले. मैदानात फार कमी वेळा संजूचा असा अवतार पाहायला मिळतो. मग क्लासेनही चिडला. मैदानात या दोन खेळाडूंमध्ये शाब्दिक वाद रंगला. शेवटी शिवम दुबेनं सनरायझर्स हैदराबादच्या बॅटरला शांत करत त्याला पॅव्हेलियनच्या दिशेनं जाण्यास सांगितले. मैदानातील हा ड्रामा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
Web Summary : During CSK vs SRH, Sanju Samson's quick stumping, reminiscent of MS Dhoni, dismissed Heinrich Klaasen, leading to a heated exchange. Shivam Dube intervened to mediate. Klaasen showed his batting class before the dismissal.
Web Summary : CSK vs SRH के दौरान, संजू सैमसन ने एमएस धोनी की तरह तेज़ी से स्टंपिंग करके हेनरिक क्लासेन को आउट किया, जिसके बाद दोनों के बीच तीखी बहस हुई। शिवम दुबे ने बीच बचाव किया। आउट होने से पहले क्लासेन ने अपनी बल्लेबाजी का जौहर दिखाया।