Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ

चेन्नई सुपर किंग्सने सहा पराभवानंतर घरच्या मैदानात अखेर विजय मिळवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 23:42 IST

Open in App

IPL 2026 CSK vs DC Chennai Super Kings Won By 23 Runs vs Delhi Capitals : चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने चेपॉकच्या घरच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्सला रोखत आयपीएल २०२६ स्पर्धेतील आपला पहिला विजय मिळवला आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सवर सलग दुसऱ्या पराभवाची नामुष्की ओढावली. पहिल्यांदा फलंदाजी करताना संजू सॅमसनचं नाबाद शतक आणि आयुष म्हात्रेच्या अर्धशतकासह शिवम दुबेनं केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने निर्धारित २० षटकात २ विकेट्सच्या मोबदल्यात २१२ धावा करत दिल्ली कॅपिटल्ससमोर २१३ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

या धावसंख्येचा पाठलाग करताना सलामीवीर निसंका आणि स्टब्सशिवाय एकालाही मोठी खेळी करता आली नाही. जोपर्यंत स्टब्स मैदानात होता तोपर्यंत दिल्ली कॅपिटल्सला चमत्काराची आस होती. पण त्याची विकेट पडली आणि दिल्लीकरांच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आल्या. अखेरच्या चेंडूवर शेवटच्या विकेटसह दिल्ली कॅपिटल्सचा संघ १८९ धावांवर ऑलआउट झाला. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्सने घरच्या मैदानात ६ पराभवानंतर अखेर विजय मिळवला आहे. CSK कडून गोलंदाजीत जेमी ओव्हरटन आणि अंशुल कुंबोज यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याशिवाय चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने या सामन्यात कमालीच्या क्षेत्ररक्षणाचा नजराणाही दाखवून दिला.  

Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)संजूचं नाबाद शतकासह आयुष म्हात्रेनं अर्धशतकासह लुटली मैफील

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपला निर्णय सार्थ ठरवण्यासाठी त्यानेच चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडची विकेट घेतली. संघाच्या धावफलकावर ६२ धावा असताना ऋतुराज गायकवाड १५ धावा करून माघारी फिरला. मग संजू सॅमसन आणि आयुष म्हात्रे जोडी जमली.  दोघांनी ६८ चेंडूत ११३ धावांच्या भागीदारी रचत दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला बॅकफूटवर ढकलले.  संजू सॅमसन याने ५२ धावांवर निसंकाने  झेल सोडल्यामुळे मिळालेल्या संधीच सोनं करताना ५६ चेंडूत १५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ११५ धावांची नाबाद खेळी केली. आयुष म्हात्रे ३६ चेंडूत ५९ धावा करून रिटायर्ड आउट झाल्यावर मैदानात उतरलेल्या शिवम दुबेनं १० चेंडूत २० धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्सने फक्त दोन विकेट्सच्या मोबदल्यात २१२ धावा करत पहिल्या विजयासाठी दिल्ली कॅपिटल्ससमोर विक्रमी टार्गेट सेट केल्याचे पाहायला मिळाले.

निसंकाच्या दमदार खेळीनंतर स्टब्सचं अर्धशतक, पण...

या धावसंख्येचा पाठलाग करताना पथुम निसंका आणि लोकेश राहुल जोडीनं दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी रचली. खलील अहमद याने लोकेश राहुलला १८ धावांवर तंबूचा रस्ता दाखवत चेन्नई सुपर किंग्सला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर जेमी ओव्हरटन, अंशुल कंबोज आणि पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या गुरजपनीत सिंग याने दिल्लीच्या संघाला धक्क्यावर धक्के दिले. पथुम निंसका याने २४ चेंडूत केलेल्या ४१ धावांच्या खेळीनंतर ट्रि्स्टन स्टब्सनं ३८ चेंडूत ६० धावांची खळी साकारली. पण जेमी ओव्हरटन याने त्याच्या विकेटसह सामन्यात सर्वाधिक चार विकेट्सचा डाव साधत संघाच्या विजयातील मोठा अडथळा दूर केला. अंशुल कंबोजनं अखेरच्या चेंडूवर या सामन्यातील आपली तिसरी विकेट घेत दिल्ली कॅपिटल्सला ऑलआउट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Samson's Century, Overton's Four Wickets; CSK Wins Against DC

Web Summary : CSK defeated DC by 23 runs in IPL 2026, securing their first win. Samson's century and useful innings from Dube powered CSK to 212. DC was all out on 189. Overton and Kumbhoj starred in CSK's bowling attack.
टॅग्स :आयपीएल २०२६चेन्नई सुपर किंग्सदिल्ली कॅपिटल्ससंजू सॅमसनआयुष म्हात्रेऋतुराज गायकवाड