Krunal Pandya, Man of the Match in Final : इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने पंजाब किंग्जला रोखत १७ वर्षांचा दुष्काळ संपवत पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. पहिल्यांदा फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने पंजाबसमोर १९१ धावांचे आव्हान ठेवले होते. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ ही लढाई जिंकेल, असे वातावरणही निर्माण झाले होते. पण क्रुणाल पांड्याने आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवत मॅच फिरवली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
४ षटकात १७ धावा अन् २ विकेट्स; त्यात १२ चेंडू टाकले निर्धाव
क्रुणाल पांड्यानं यंदाच्या हंगामात संघासाठी मोक्याच्या क्षणी उपयुक्त कामगिरी करुन दाखवलीये. फायनल सामन्यात त्याने ४ षटकांत फक्त १७ धावा खर्च करताना २ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. त्याने टाकलेल्या १२ निर्धाव चेंडूमुळे सामना RCB च्या बाजूनं वळवला. या कामगिरीच्या जोरावर अंतिम सामन्यात तो सामनावीरही ठरला. यासह त्याच्या नावे खास विक्रमाची नोंद झाली आहे. IPL च्या आतापर्यंतच्या इतिहासात कुणाला जमलं नाही ते क्रुणाल पांड्याने करून दाखवलं आहे.
"१८ वर्षांनंतर स्वप्न पूर्ण झाले"; RCB च्या विजयावर मल्ल्या म्हणाला, "माझी इच्छा पूर्ण करणाऱ्या..."
असा पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू
क्रुणाल पांड्याने आयपीएलच्या फायनल लढतीत मॅच विनिंग कामगिरीसह दुसऱ्यांदा सामनावीर पुरस्कार पटकवला आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात अशी कामगिरी अन्य कुणालाही जमलेली नाही. २०१७ च्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खेळताना क्रुणाल पांड्याने पुणे सुपर जाएंट्स विरुद्धच्या सामन्यात दमदार कामगिरीसह पहिल्यांदा सामनावीरचा पुरस्कार पटकवला होता. आता ८ वर्षांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघासाठी त्याने सामन्याला कलाटणी देणारी कामगिरी करत IPL च्या फायनलमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर होण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.
यंदाच्या हंगामातील कामगिरी
क्रुणाल पांड्याने यंदाच्या हंगामातील सुरुवात ही सामनावीर पुरस्कारासह केली होती. त्यानंतर शेवटच्या सामन्यातही त्याने आपली छाप सोडली. यंदाच्या हंगामात दोन वेळा सामनावीर ठरलेल्या क्रुणाल पांड्यानं १५ सामन्यातील १५ डावात १७ विकेट्स घेतल्या आहेत. ४५ धावा खर्च करत ४ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली.
Web Title: IPL 2025 Winner Krunal Pandya Become First Player In IPL History To Win Two Player Of The Match Award In Final First For MI And Now RCB
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.