IPL 2025 : "एक बिहारी सौ पर भारी" असाच आहे दिल्लीकर झालेल्या या 'बिहारी बाबू'चा तोरा

इथं आपण गेल्या काही हंगामापासून आयपीएल गाजवणाऱ्या बिहारी क्रिकेटरबद्दलची खास स्टोरी जाणून घेऊयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 15:47 IST2025-05-05T15:45:18+5:302025-05-05T15:47:56+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 SRH vs DC 55th Match Lokmat Player to Watch Mukesh Kumar Delhi Capitals | IPL 2025 : "एक बिहारी सौ पर भारी" असाच आहे दिल्लीकर झालेल्या या 'बिहारी बाबू'चा तोरा

IPL 2025 : "एक बिहारी सौ पर भारी" असाच आहे दिल्लीकर झालेल्या या 'बिहारी बाबू'चा तोरा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 SRH vs DC 55th Match Player to Watch  Mukesh Kumar Delhi Capitals  : यंदाचा आयपीएल हंगाम बिहाराच्या पोरामुळे ऐतिहासिक ठरलाय. १४ वर्षीय वैभव सूर्यंवशी याने राजस्थान रॉयल्सकडून दमदार कामगिरी केल्यावर अनेकांना बिहारींच्या कौतुकासाठी वापरली जाणारी "एक बिहारी सौ पर भारी" ही लोकप्रिय म्हण आठवली. इथं आपण अशाच तोऱ्यात गेल्या काही हंगामापासून आयपीएल गाजवणाऱ्या बिहारी क्रिकेटरबद्दलची खास स्टोरी जाणून घेऊयात जो दिल्ली कॅपिटल्स्या ताफ्यातून हवा करताना दिसतोय. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

बिहारी बाबूनं दिल्लीकर होऊन सोडलीये खास छाप

दिल्लीच्या संघासाठी उपयुक्त अशी कामगिरी करणाऱ्या बिहारी क्रिकेटर म्हणजे मुकेश कुमार. आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासून सलग तिसऱ्या हंगामात तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसतोय. २०२२ च्या मेगा लिलावात मुकेश कुमारसाठी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने ५.५० कोटी एवढी मोठी बोली लावली होती. यंदाच्या हंगामात तो ८ कोटी प्राइज टॅगसह या संघातील प्रमुख खेळाडू आहे. 

IPL 2025 : ऑरेंज आर्मीचं गणित फसलंय! १ कोटींचं पॅकेज दिलं, पण याच्यावर भरवसाच नाही ठेवला

यंदाच्या हंगामात नोंदवली IPL मधील सर्वोच्च कामगिरी

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत मिचेल स्टार्क (१४ विकेट्स) आणि कुलदीप यादव (१२ विकेट्स) पाठोपाठ मुकेश कुमार तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने १० सामन्यात ९ विकेट्स घेतल्या आहेत. आतापर्यंत आयपीएलमध्ये ३० सामन्यात त्याच्या खात्यात ३३ विकेट्स जमा असून ३३ धावा खर्च करून ४ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी त्याने यंदाच्या हंगामातच नोंदवली आहे. लखनौ विरुद्धच्या सामन्यात त्याने हा डाव साधला होता. गत हंगामात त्याने १० सामन्यात १७ विकेट्स घेतल्या होत्या. गत हंगामाच्या तुलनेत यंदा तो थोडा कमी पडला असला तरी उर्वरित सामन्यात तो संघासाठी महत्त्वपूर्ण गोलंदाज ठरू शकतो.

दादानं हेरलं; अन् बिहारी बाबूचं नशीबच पालटलं

मुकेश कुमार याचा जन्म बिहारच्या गोपालगंज येथे झाला. उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी करणाऱ्या या बिहारी क्रिकेटरनं  २०२० मध्ये  सौरव गांगुली व्हिजन प्रोग्रामअंतर्गत घेण्यात आलेल्या ट्रायलमध्ये आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवून दिली अन् त्याने पश्चिम बंगाल क्रिकेटर असोसिएशनसोबत आपल्या क्रिकेट प्रवासाची सुरुवात केली. लेकाच्या नव्या स्वप्नाला दिशा देण्यासाठी त्याचे वडील बंगालमध्ये टॅक्सी ड्रायव्हरच्या रुपात काम करायचे. या गड्यानं कठोर मेहनतीसह बाबाच्या कष्टाचं चीज केलं. आयपीएलमध्ये तो करोडपती झालाच. पण टीम इंडियाकडूनही त्याने तिन्ही फॉर्मेटमध्ये पदार्पण केल्याचेही पाहायला मिळाले आहे. 

Web Title: IPL 2025 SRH vs DC 55th Match Lokmat Player to Watch Mukesh Kumar Delhi Capitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.