Join us

विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)

बुमराहच्या गोलंदाजीचा सामना करणं सोपं नसते, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 22:36 IST

Open in App

IPL 2025 Shot Of The Tournamen : इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या हंगामात अनकॅप्ड खेळाडूंसह काही अनुभवी खेळाडूंनी आपली विशेष छाप सोडलीये. पंजाब किंग्जकडून कर्णधार श्रेयस अय्यर याने प्रत्येक सामन्यात धमक दाखवली. याशिवाय विराट कोहलीनं देखील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाकडून अपेक्षित कामगिरी केली. यंदाच्या हंगामात सर्वाधिक अर्धशतके झळकावताना किंग कोहलीच्या भात्यातून डोळ्याचे पारणे फेडणारे फटके पाहायला मिळाले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

किंग कोहलीनं सिक्सरसह केलं होतं बुमराहचं स्वागत

पण या स्पर्धेत त्याच्या भात्यातून निघालेल्या सर्वात लक्षवेधी फटका ठरला तो जसप्रीत बुमराहच्या स्वागत करताना त्याने मारलेला तो उत्तुंग षटकार. वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात बुमराहच्या गोलंदाजीवर विराट कोहलीनं मारलेला फटका पाहून अनेकांना टी-२० वर्ल्ड कप  स्पर्धेत त्याने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात हॅरिस राउफला मारलेला षटकारही आठवला असेल. बुमराहनं टाकलेल्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर विराट कोहलीनं मिडविकेटच्या दिशेनं मारलेला सिक्सर हा यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम फटका होता. 

 

तीन वेगवेगळ्या संघांना आयपीएल फायनलमध्ये नेणाऱ्या श्रेयस अय्यरचे घर पाहिले का...?

मग अय्यरच्या भात्यातून आला किंग कोहलीला टक्कर देणारा फटका' 

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्धच्या क्लालिफायर २ च्या लढतीत श्रेयस अय्यरनं दिमाखदार बॅटिंग केली. मॅच विनिंग खेळीसह त्याने पंजाबच्या संघाला फायनलमध्ये नेले. या खेळीत त्याने जसप्रीत बुमराहनं टाकलेल्या यॉर्करवर खेळलेला फटका हा अप्रतिम असाच होता. बुमराहनं टाकलेल्या अचूक यॉर्कर लेंथ चेंडूवर श्रेयस अय्यरनं आपल्या बॅटिंगमधील क्लास दाखवून देत चार धावा मिळवल्या. त्याने खेळलेला हा फटका यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम फटका असल्याची चर्चाही रंगू लागलीये. बऱ्याचदा नशीबानं बॅटरला असा चौकार मिळतो. पण अय्यरच्या बाबतीत तसं झालं नाही.  अगदी १० वर्षांपूर्वी दिल्ली डेअरडेविल्सच्या ताफ्यातून खेळताना अय्यरनं बुमराहच्या यॉर्करवर सेम टू सेम फटका मारला होता. त्यामुळेच विराटच्या षटकारापेक्षा अय्यरचा चौकार भारी ठरतो. 

बुमराहचा सामना करणं सोपं नाही, पण..

सध्याच्या घडीला जसप्रीत बुमराह क्रिकेट जगतातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजीवर आक्रमक अंदाजात खेळण्यापेक्षा फलंदाज बचावात्मक खेळ करताना दिसतात. पण या हंगामात काही फलंदाजांनी त्याच्यासमोर तेवर दाखवल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहली आणि श्रेयस अय्यरशिवाय भारताचा देशांतर्गत क्रिकेटमधील हिरो करूण नायर यानेही  बुमराहसमोर कडक फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५इंडियन प्रीमिअर लीगविराट कोहलीश्रेयस अय्यरजसप्रित बुमराहटी-20 क्रिकेटव्हायरल व्हिडिओ