Join us

IPL 2025 RR vs SRH: 'तीन सामन्यांचा कर्णधार' रियान परागपुढे 'हटके' छाप पाडण्याचं आव्हान

Riyan Parag Rajasthan Royals Player to Watch, IPL 2025 RR vs SRH: संजू सॅमसन केवळ इम्पॅक्ट प्लेयर, खऱ्या कर्णधारासमोर रियान पराग करणार 'कॅप्टन्सी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 23:47 IST

Open in App

Riyan Parag Rajasthan Royals Player to Watch, IPL 2025 RR vs SRH: आयपीएलचा नवा हंगाम शनिवारपासून सुरू झाला. सलामीच्या सामन्यात बेंगळुरूने कोलकाताला पराभूत केले. रविवारी डबल हेडर म्हणजेच दोन सामने होणार आहेत. त्यातील पहिला सामना सनरायजर्स हैदराबाद विरूद्ध राजस्थान रॉयल्स असा रंगणार आहे. यंदाच्या हंगामात राजस्थानचा नियमित कर्णधार संजू सॅमसन संघात असूनही पहिल्या तीन सामन्यात तो कर्णधार नसणार आहे. तो किपिंगदेखील करणार नाही. तो केवळ एक फलंदाज म्हणून संघात इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपाने खेळेल. अशा परिस्थितीत या तीन सामन्यांसाठी राजस्थानने कॅप्टन्सीची जबाबदारी रियान परागवर सोपवली आहे. त्यामुळे या सामन्यात रियान परागच्या कामगिरीवर साऱ्यांचेच लक्ष असणार आहे.

कमी वयाचा कर्णधार

रियान पराग हा एक युवा खेळाडू आहे. IPL इतिहासातील युवा कर्णधारांपैकी एक ठरण्याचा मान त्याला मिळाला आहे. विराट कोहलीला वयाच्या २२व्या वर्षी कॅप्टन्सी मिळाली होती. त्यापाठोपाठ आता रियान परागला वयाच्या २३व्या वर्षी ही जबाबदारी मिळाली आहे. सुरेश रैना आणि श्रेयस अय्यर या दोघांनाही पहिल्यांदा वयाच्या २३व्या वर्षीच IPL कॅप्टन्सी मिळाली होती.

द्रविड-रियान जुनं कनेक्शन

राजस्थानच्या संघाबाबत आणखी एक मुद्दा म्हणजे, रियान पराग हा कोच राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली कर्णधारपद भूषवणार आहे. द्रविड हा रियान परागला १९ वर्षाखालील टीम इंडियामध्ये असल्यापासून पाहतो आहे. त्यामुळे या दोघांच्या बॉन्डिंगचाही राजस्थानला फायदा होईल असे मानले जात आहे.

रियान परागची IPL कारकिर्द

रियान पराग सर्वप्रथम IPL 2019 मध्ये झळकला. त्या हंगामात त्याने ७ सामन्यात १६० धावा केल्या होत्या. यात एक अर्धशतकाचा समावेश होता. त्यानंतर तो सलग सहाव्यांदा IPL खेळताना दिसणार आहे. आतापर्यंत त्याने ७० सामने खेळले असून नाबाद ८४ हा त्याचा सर्वोत्तम स्कोअर आहे. त्याने ११७३ धावा केल्या आहेत. त्याला अद्याप एकही शतक झळकावता आले नसले तरी त्याने ६ अर्धशतके ठोकली आहेत. २०१९ ते २०२१ या काळात त्याने गोलंदाजीही केली असून त्यात त्याला केवळ ३ बळी मिळाले.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५राजस्थान रॉयल्ससनरायझर्स हैदराबादसंजू सॅमसनराहुल द्रविड