Join us

IPL 2025 : MI च्या ताफ्यातील भरवशाचा मोहरा; मध्यफळीसह सातव्या क्रमांकावरही दाखवलाय तोरा

आयपीएल २०२५ आधी झालेल्या मेगा लिलावातील सर्वात महागड्या अनकॅप्ड भारतीय खेळाडूंपैकी तो एक आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 16:30 IST

Open in App

IPL 2025 RR vs RCB 29th Match  Player to Watch Naman Dhir Mumbai Indians : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सचा संघ संघर्ष करताना दिसतोय. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघ पराभवाची मालिका खंडीत करून पुन्हा ट्रॅकवर येण्यासाठी प्रयत्नशील असेल. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील जसप्रीत बुमराह, रोहित शर्मासह सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या हे स्टार खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असतील. पण याशिवाय मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील नमन धीरच्या कामगिरीवरही सर्वांच्या नजरा असतील. जाणून घेऊयात या खेळाडूसंदर्भातील खास माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

तो महागड्या अनकॅप्ड खेळाडूंपैकी एक

नमन धीर हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. उजव्या हाताने फलंदाजी करण्यासोबत तो ऑफ स्पिन गोलंदाजीही करू शकतो. आयपीएल २०२५ आधी झालेल्या मेगा लिलावातील सर्वात महागड्या अनकॅप्ड भारतीय खेळाडूंपैकी तो एक आहे.  मुंबई इंडियन्सच्या संघानं ५.२५ कोटी रुपये मोजले आहेत. गत हंगामात ७ सामन्यात संधी मिळालेल्या नमन धीरला यंदाच्या हंगामात पहिल्यापासून संघात संधी मिळतीये. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत LSG विरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाल्यावर त्याने २४ चेंडूतील ४६ धावांच्या खेळीसह लक्षवेधून घेतले. पण रोहित पुन्हा संघात परतल्यावर तो सातव्या क्रमांकावर खेळतान दिसले.

 IPL मधील सर्वोच्च खेळी

आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या १२ सामन्यात त्याने २३२ धावा केल्या असून त्याच्या खात्यात एका अर्धशतकाची नोंद आहे. गत हंगामात लखनौच्या संघाविरुद्ध त्याने २८ चेंडूत नाबाद ६२ धावांची खेळी केली होती. त्याची ही खेळी सातव्या क्रमांकावर खेळताना आली होती. हा खेळाडू मध्यफळीसह अखेरच्या षटकातही संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. हार्दिक पांड्या या खेळाडूचा वापर कसा करून घेणार त्याचा संघाला कितपत फायदा मिळणार ते बघण्याजोगे असेल. 

टी-२० मध्ये त्याच्या खात्यात एका शतकाचीही आहे नोंद

देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबकडून खेळणाऱ्या नमन धीर  शेर ए पंजाब या लोकल टी-२० लीगमधून प्रकाश झोतात आला होता. याच स्पर्धेतील लक्षवेधी खेळीमुळे मुंबई इंडियन्सच्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. या लीगमध्ये त्याने ५६ चेंडूत १२७ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. 

 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५मुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्सइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट