IPL 2025 RR vs MI 50th Match Player to Watch Maheesh Theekshana Rajasthan Royals आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ५० वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात रंगणार आहे. यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्स प्लेऑफ्स गाठणार का? यापेक्षा वैभव सूर्यंवशी नवे चॅलेंजचा सामना कसा करणार याचीच सध्या सर्वाधिक चर्चा रंगताना दिसते. राजस्थान रॉयल्सच्या संघाने आतापर्यंत खेळलेल्या १० पैकी फक्त ३ सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे स्पर्धेत निभाव लागणे त्यांच्यासाठी मुश्किलच झाले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राजस्थानसाठी मुंबई इंडियन्सविरुद्धची लढाई महत्त्वाची, कारण....
पहिल्या १० पैकी ७ सामने गमावल्यामुळे उर्वरित ४ सामने जिंकूनही ते फक्त १४ गुणांपर्यंत पोहचू शकतील. हे गणित त्यांनी जुळवून आणलं तरी प्लेऑफ्स गाठण्यासाठी त्यांना अन्य संघाच्या निकालावर अवलूंबन राहावे लागेल. शेवटपर्यंत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी ते मुंबई इंडियन्स विरुद्धचा सामना जिंकण्यासाठी प्रयत्नशील असतील. हा सामना गमावला तर त्यांचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात येईल. हे संकट टाळण्यासाठी मुंबई इंडियन्सविरुद्ध यशस्वी जैस्वालसह वैभव सूर्यंवशी यांच्यावर पुन्हा नजरा असतील. गोलंदाजीत जोफ्रा आर्चरसह संघाला महीश तीक्षणाकडून मोठ्या अपेक्षा असतील. इथं एक नजर टाकुयात श्रीलंकन फिरकीपटूच्या यंदाच्या हंगामातील कामगिरीवर...
IPL 2025 : वडिलांचा वारसा जपण्यासाठी आईनं दिलं बळ; आता पाकच्या नाकावर ठिच्चून IPL मध्ये रुबाब
पॉवर प्लेमध्येही विकेट घेण्याची क्षमता
श्रीलंकन फिरकीपटू हा सामन्याला कलाटणी देणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे. उजव्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजी करणाऱ्या फिरकीपटूनं जयपूरच्या मैदानात गुजरात विरुद्धच्या सामन्यात उपयुक्त ठरल्याचेही पाहायला मिळाले होते. या सामन्यात त्याने २ विकेट्स घेतल्या होत्या. तो पॉवर प्लेमध्ये विकेट घेण्याची क्षमता असल्यामुळे कॅप्टन त्याच्या हाती लवकर चेंडू सोपवतानाही दिसते. मुंबई इंडियन्स विरुद्ध तो छाप सोडणार का? ते पाहण्याजोगे असेल.
महीश तीक्षणाची IPL मधील कामगिरी
मागील तीन हंगामात चेन्नईकडून ७० लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजसह खेळणाऱ्या या गड्यासाठी राजस्थान रॉयल्सच्या संघाने ४ कोटी ४० लाख एवढी मोठी रक्कम मोजून आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. यंदाच्या हंगामात ९ सामन्यात त्याने ९ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. RR संघासाठी उर्वरित प्रत्येक सामना महत्त्वाचा असताना सर्वोच्च कामगिरीसह पैसा वसूल कामगिरी करून दाखवण्याचे चॅलेंज त्याच्यासमोर असेल.
Web Title: IPL 2025 RR vs MI 50th Match Lokmat Player to Watch Maheesh Theekshana Rajasthan Royals
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.