आयपीएलमध्ये म्हणजे फलंदाजांचा गेम. इथं रंगतदार सामन्यात बहुतांशवेळा बॅटरच बाजी मारतो. पण आवेश खानने अचूक यॉर्करचा मारा करत जयपूरचं मैदान गाजवलं. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने ९ धावांचा बचाव करत लखनौच्या संघाला २ धावांनी विजय मिळवून दिला. आपल्या चार षटकातील कोट्यात त्याने ३७ धावा खर्च करताना मोक्याच्या क्षणी ३ विकेट्स घेतल्या. या कामगिरीबद्दल त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तो चेंडू अडवल्यावर तारे दिसले..
अखेरच्या चेंडूवर चार धावांची गरज असताना शिभम दुबेन जोरदार फटका मारला. चौकार वाचवण्यासाठी आवेश खानने हात आडवा घातला अन् तो वेदनेनं व्याकूळ झाल्याचे पाहायला मिळाले. सामन्यानंतर तो म्हणाला की, चेंडू एवढ्या जोरात लागला की, हात फॅक्चरच झालाय असे वाटले. मला तारेच दिसले. त्यामुळे मला विजयाचे सेलिब्रेशनही करता आले नाही.
Vaibhav Suryavanshi : आधी बरसला, मग हुंदका दाटला! भावूक होऊन तंबूत परतला वैभव
तुला मिचेल स्टार्क व्हायचंय का?
सामनावीर पुरस्कार देताना मुरली कार्तिकने आवेश खानची तुलना ऑस्ट्रेलियन स्टार मिचेल स्टार्कशी केल्याचे पाहायला मिळाले. याआधी राजस्थानच्या संघाला दिल्ली कॅपिटल्स विरुद्धचा सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी मिचेल स्टार्कने आपल्या भेदक माऱ्याने मॅच फिरवली होती. याच मॅचचा दाखला देत मुरली कार्तिकने आवेश खानची ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केली. तुला मिचेल स्टार्क व्हायचंय का? असा प्रश्न मुरली कार्तिकनं आवेश खानला विचारला. यावर आवेश खान याने एकदम छान रिप्लाय दिल्याचे पाहायला मिळाले.
आवेश खानचा असा होता रिप्लाय
मला मिचेल स्टार्क व्हायचं नाही. मला चांगली गोलंदाजी करणारा आवेश खानच व्हायचं आहे. यॉर्कर लेंथ ही माझी स्टेंथ आहे. मी त्याचा वापर यशस्वीरित्या करण्यासाठी प्रयत्नशील असतो. धावफलकाकडे न पाहता मी कामगिरी उत्तम करण्याकडे अधिक लक्ष देतो. अखेरच्या षटकात ९ धावा बचाव करण्यासाठी पहिले तीन चेंडू चांगला टाकायचे होते. हे डोक्यात ठेवूनच गोलंदाजी केली. या षटकात शुबमने चेंडू हवेत मारला त्यावेळी डेविड मिलर बॉलवर येत असल्यामुळे टेन्शन फ्री होतो. पण त्याने कॅच सोडला. अखेरच्या चेंडूवर ४ धावांचा बचाव करणे कठीण होते. मी यॉर्करचा प्लॉन केला होता. पण या परिस्थितीत बॅटची कड घेऊन चौकार मिळू शकतो. शेवटी यश मिळाले. उर्वरित सामन्यातही अशीच कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन.
पहिल्या दोन ओव्हरमध्ये महागडा ठरला. उर्वरित २ षटकात ३ विकेट्स घेत फिरवला सामना
राजस्थान विरुद्धच्या सामन्यात पहिल्या दोन षटकात आवेश खान याने २६ धावा खर्च केल्या होत्या. अखेरच्या १८ चेंडूत २५ धावांची गरज असताना तो गोलंदाजीला आला. या षटटातील पहिल्याच चेंडूवर त्याने सेट झालेल्या य़शस्वी जैस्वालला बोल्ड आउट केले. रियान परागची विकेट घेऊन त्याने हे षटक संपवले. या दोन विकेट्समुळे राजस्थानचा संघ पुन्हा बॅकपूटवर गेला. अखेरच्या षटकात आवेश खानने आणखी एक विकेट घेत ९ धावांचा बचाव करून संघाला हातून निसटलेला सामना जिंकून दिला.