IPL 2025 RR vs LSG 36th Match : जयपूरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात आवेश खानच्या परफेक्ट यॉर्करच्या माऱ्याच्या जोरावर लखनौच्या संघानं घरच्या मैदानावर खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सला रोखत हातून निटलेला सामना जिंकून दाखवला. अखेरच्या षटकात ६ विकेट्स हातात असताना राजस्थानच्या संघाला ९ धावांची गरज होती. या षटकात अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत आवेश खानने एक विकेट घेतली आणि शेवटी आपल्या संघाला सामनाही जिंकून दिला. दुसऱ्या बाजूला राजस्थान रॉयल्सच्या संघाने हातात आलेला सामना २ धावांनी गमावला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!धावांचा पाठलाग करताना यशस्वीसह वैभवनं संघाला दमदार सुरुवात करून दिली, पण... लखनौच्या संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना मार्करम याने ४५ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने केलेल्या ६६ धावांची खेळी, त्यानंतर आयुष बडोनी याने ३४ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने केलेल्या ५० धावांच्या खेळीनंतर अब्दुल समदने १० चेंडूत ४ षटकाराच्या मदतीने केलेल्या ३० धावांच्या जोरावर लखनौच्या संघाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात १८० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल ७४ (५२) आणि वैभव सूर्यवंशी ३४ (२०) या जोडीनं संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८५ धावा करत लखनौच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. कर्णधार रियान पराग याने २६ चेंडूत ३९ धावा केल्या. पण मोक्याच्या क्षणी त्याने आपली विकेट गमाली. १८ व्या षटकात तो बाद झाला अन् सामन्यात ट्विस्ट आले. आवेश खाननेच ही महत्त्वपूर्ण विकेट घेतली.
Vaibhav Suryavanshi : आधी बरसला, मग हुंदका दाटला! भावूक होऊन तंबूत परतला वैभव
आवेश खानने परफेक्ट यॉर्करचा मारा करत LSG ला जिंकून दिला सामना
१२ चेंडूत २० धावांची गरज असताना पंतने चेंडू प्रिन्स यादवच्या हाती दिला. त्याने १९ व्या षटकात ११ धावा खर्च केल्या आणि अखेरच्या षटकात राजस्थानच्या संघाला विजयासाठी फक्त ९ धावांची गरज होती. सामना पूर्णता राजस्थानच्या हातात होता. पण आवेश खान पुन्हा आला अन् त्याने कमालीची गोलंदाजी करत राजस्थान रॉयल्सच्या हातून हिसकावून घेतला. पहिलाच चेंडू यॉर्कर लेंथ टाकत त्याने ध्रुव जुरेलला मोठी फटकेबाजी करण्यापासून रोखले. पहिल्या चेंडूवर फक्त एक धाव आली. मग मोठी फटकेबाजी करण्याची क्षमा असलेला हेटमायर स्ट्राइकवर आला. दुसऱ्या चेंडूवर त्याने दोन धावा घेतल्या. पण तिसऱ्या चेंडूवर त्याची विकेट घेत आवेश खानने विजयातील मोठा अडथळा दूर केला. ३ चेंडूत ६ धावांची गरज असताना शुबम दुबेला त्याने निर्धाव चेंडू टाकला. हा देखील एक परफेक्ट यॉर्कर होता. पाचव्या चेंडूवर एक कॅचची संधी निर्माण झाली. पण मिलरने हा झेल सोडला. अखेरच्या चेंडूवर RR ला धोन धावांची गरज होती. पण आवेशनं यावेळीही मोठा फटका मारू दिला नाही. या चेंडूवर दोनच धावा आल्या आणि लखनौच्या संघाने २ धावांनी सामनाखिशात घातला.