IPL 2025 RR vs GT Shubman Gill's Sister Shahneel Gill Reaction Pics Goes Viral जयपूरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचा कार्यवाहू कर्णधार रियान पराग याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. गुजरात टायटन्सची सलामी जोडी शुबमन गिल आणि साई सुदर्शन या जोडीनं त्याचा हा निर्णय चुकीचा ठरवला. दोघांनी पुन्हा एकदा संघाला दमदार सुरुवात करून दिली. ही जोडी सेट करण्यात राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनही खराब क्षेत्ररक्षणासह हातभार लावल्याचे पाहायला मिळाले. साई सुदर्शनसह शुबमन गिलला या सामन्यात जीवनदान मिळाल्याचे पाहायला मिळाले. शुबमन गिलचा कॅच सुटल्यावर स्टँडमध्ये उपस्थितीत त्याची बहीण शाहनील गिलची (Shahneel Gill) रिॲक्शन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
शाहनील गिलनं मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन ठरतीये चर्चेचा विषय
गुजरात टायटन्सच्या डावातील सातव्या षटकात रियान पराग गोलंदाजी करत होता. या षटकात पहिल्याच चेंडूवर साई सुदर्शन याने एक धाव घेत स्ट्राइक शुबमम गिलला दिले. दुसऱ्या चेंडूवर दोन धाव घेतल्यावर शुबमन गिलनं या षटकातील तिसऱ्या चेंडूवर षटकार मारला. चौथ्या चेंडूवरही त्याने मोठा फटका खेळला. पण आयपीएलमधील युवा क्रिकेटर वैभव सूर्यंवशीनं त्याचा झेल टिपण्याची संधी गमावली. हा झेल सुटल्यावर कॅमेरा स्टँडमध्ये बसलेल्या शुबमन गिलची बहिण शहानील गील हिच्यावर फिरला. भावाचा कॅच सोडल्यावर तिने थेट हात जोडून देवाचे आभार मानल्याचे दिसून आले. हा कॅच सुटला त्यावेळी शुबमन गिल १८ चेंडूवर ३३ धावांवर खेळत होता. या संधीचा फायदा उठवत त्याने दमदार अर्धशतक झळकावल्याचे पाहायला मिळाले.
फिफ्टी मारली, पण सेंच्युरीची संधी हुकली
डावातील सातव्या षटकात मिळालेल्या संधीच सोन करताना शुबमन गिलनं कडक फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले. या सामन्यात तो पुन्हा एकदा शतकाच्या दिशेनं वाटचाल करताना दिसला. पण तीक्षणाच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. त्याने ५० चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ८४ धावांची खेळी केली. या आधीच्या सामन्यात कोलकाता विरुद्धच्या सामन्यातही गिल शतकाच्या जवळ पोहचला होता. पण ९० धावांवर तो बाद झाला होता. या सामन्यात हेटमायरनंही दुसऱ्याच षटकात साई सुदर्शनचा एक सोपा झेलही सोडल्याचे पाहायला मिळाले.