Rahul Dravid Gets Off Wheelchair To Celebrate Vaibhav Suryavanshi Century : जयपूरच्यासवाई मानसिंह स्टेडियमवर रंगलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीनं एका मागून एक विक्रम रचल्याचे पाहायला मिळाले. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक झळकवल्यावर तेवढ्यावरच न थांबता त्याने सर्वात कमी वयात शतक झळकवण्याचा वर्ल्ड रेकॉर्डही प्रस्थापित केला. टी २० क्रिकेटमधील तो सर्वात युवा शतकवीर ठरलाय. वैभवनं १४ वर्षे ३२ दिवस वयात शतक साजरे केल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक झळकवणारा भारतीय असा विक्रमही त्याच्या नावे झाला आहे. वैभवच्या ऐतिहासिक खेळीनंतर राहुल द्रविडला झालेला आनंद बघण्याजोगा होता.
पायाची दुखापत विसरून उभे राहून द्रविडनं दिली वैभवच्या शतकी खेळीला दाद
राजस्थान रॉयल्सच्या डावातील १२ व्या षटकात त्याने ऐतिहासिक शतक साजरे केले. या षटकात प्रसिद्ध कृष्णाच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारत तो ९४ धावांवर पोहचला. मग दुसऱ्या चेंडूवर त्याने षटकार मारत विक्रमी शतक साजरे केले. शतकानंतर त्याने बॅटसह सेल्यूट करत या शतकाचा आनंद व्यक्त केला. डग आउटमध्ये बसलेल्या आणि पायाच्या दुखापतीनं त्रस्त असलेल्या राहुल द्रविडनं उभे राहून वैभवच्या शतकी खेळीला दाद दिली.
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
राहुल द्रविडचं हे सेलिब्रेशन एकदम आयकॉनिकच
आयपीएल स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच राहुल द्रविडच्या पायाला दुखापत झाली. पाय फॅक्चर असल्यामुळे तो कुबड्या अन् व्हिलचेअरच्या आधारे संघातील खेळाडूंना मार्गदर्शन करताना पाहायला मिळाले आहे. द्रविडला अजूनही नीट उभे राहता येत नाही. पण वैभवच्या शतकानंतर राहुल द्रविड व्हिलचेअर सोडून थेट उभे राहून मोठ्या उत्साहाने या शतकाचा आनंद व्यक्त करताना दिसून आले. राहुल द्रविडने आपल्या कारकिर्दीतच सोडा पण त्याच्या कारकिर्दीत भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कप जिंकला तेव्हाही असा आनंद व्यक्त केला नव्हता. त्यामुळेच वैभवच्या शतकानंतर डग आउटमध्ये राहुल द्रविडचे सेलिब्रेशन हे आयकॉनिक ठरते.