IPL 2025 RR vs CSK 10th Match Lokmat Player to Watch Rahul Tripathi Chennai Super Kings : महेंद्रसिंह धोनी याच्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्याचे नेतृत्व हे मराठमोळा चेहरा असलेल्या पुणेकर ऋतुराज गायकवाडकडे आले आहे. या संघात आणखी एक चेहरा आहे जो तसा आहे तर महेंद्रसिंह धोनीचा गाववाला, पण महाराष्ट्राचा चेहरा होऊन पुणेरी टॅगसह तो चेन्नईच्या ताफ्यातून खेळताना दिसते. सध्याच्या घडीला CSK च्या ताफ्यातील प्रमुख खेळाडू असणारा हा चेहरा म्हणजे राहुल त्रिपाठी.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राहुल त्रिपाठीनं धोनीच्या संघातून केलं IPL मध्ये पदार्पण; पण तो संघ चेन्नईचा नव्हता
यंदाच्या हंगामात चेन्नईच्या ताफ्यात सामील होण्याआधी राहुल त्रिपाठी हा वेगवेगळ्या फ्रँचायझीकडून खेळताना पाहायला मिळाले आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळताना त्याने विशेष छाप सोडलीये, हे जवळपास सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्याला टीम इंडियात पदार्पणाची संधीही मिळाली. पण तुम्हाला माहितीये का? आयपीएलच्या १८ व्या हंगामात तो पहिल्यांदाच CSK चा भाग झाला. पण त्याने आयपीएलमधील पदार्पण हे धोनीच्या संघातूनच केले होते. २०१७ मध्ये स्मिथच्या नेृत्वाखालील पुणे सुपर जाएंट्स संघातून तो धोनीसोबत खेळला होता. पदार्पणाच्या आयपीएल हंगामात धोनीकडून त्याला अनेक टिप्स मिळाल्या. यात नेट्समध्ये बिनधास्त मॅचमध्ये खेळतो तसंच मॅचमध्येही खेळायचं इथंपासून ते बाऊन्सरवर षटकार मारण्याचं बळ देणाऱ्या टिप्सचा समावेश आहे.
IPL 2025 : काव्या मारनच्या ताफ्यातील 'मोहरा'; ज्याचा हेड, अभिषेक, इशान अन् क्लासेनसारखाच आहे तोरा!
कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्याची क्षमता, CSK कडून छाप सोडण्याची नामी संधी
राहुल त्रिपाठी हा ओपनिंग करण्यापासून ते अगदी लोअर ऑर्डरमध्ये बॅटिंग करुन मॅच फिनिशिंग इनिंग खेळण्याची क्षमता असणारा खेळाडू आहे. २०२२ च्या हंगामात अनकॅप्ड खेळाडूच्या रुपात त्याने सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड केला होता. आता यंदाच्या हंगामात धोनीच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा आपले तेवर दाखवून मैफिल लुटण्याची त्याला संधी आहे. चेन्नई सुपरकिंग्सकडून पहिल्या दोन सामन्यात त्याला आघाडीच्या फलंदाजीत खेळण्याची संधी मिळाली. पण तो या संधीच सोनं करू शकला नाही. चेन्नईच्या ताफ्यात फार बदल होत नाहीत. त्यामुळे पुढेही त्याच्यावर विश्वास काय ठेवला जाईल, अशी अपेक्षा आहे. आता तो याचा कितपत फायदा उठवणार ते बघण्याजोगे असेल.
धोनीचा गाववाला कसा झाला मराठमोळा चेहरा?
राहुल त्रिपाठी याचे वडील अजय त्रिपाठी हे मुळचे झारखंड येथील रांची या गावचे आहेत. ते लष्करात अधिकारी असल्यामुळे कामानिमित्त त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग व्हायचे. राहुल त्रिपाठीचा जन्म हा रांची येथेच झाला. पण त्याचे कुटुंबिय पुण्यात स्थायिक झाले अन् राहुल त्रिपाठीनं इथूनंच खऱ्या अर्थाने आपल्या क्रिकेटच्या प्रवासाची सुरुवात केली. पुण्याच्या डेक्कन क्बल जिमखान्यात राहुल घडला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो महाराष्ट्र संघाचेच प्रतिनिधीत्व करतो. त्यामुळे तो गाववला धोनीचा असला तरी महाराष्ट्राचा चेहरा होऊन पुणेरी टॅगसह CSK तून खेळताना दिसतोय.
Web Title: IPL 2025 RR vs CSK 11th Match Lokmat Player to Watch Rahul Tripathi Chennai Super Kings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.