IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज

इथं जाणून घेऊयात मुंबई इंडियन्ससह चेन्नई सुपर किंग्ससाठी कसं आहे प्लेऑप्सचं समीकरण यासंर्भातील सविस्तर माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 01:42 IST2025-04-21T01:39:10+5:302025-04-21T01:42:35+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 Playoff Scenario For MS Dhoni Led Chennai Super Kings And Hardik Pandya Mumbai Indians | IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज

IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL Playoff Scenario For Mumbai Indians And Chennai Super Kings : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ३८ वा सामना मुंबईतील वानखेडेच्या मैदानात खेळवण्यात आला. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सच्या संघाने अगदी दिमाखात विजय नोंदवला. मुंबई इंडियन्सचा यंदाच्या हंगामातील हा चौथा विजय ठरला. खास गोष्ट ही की, अडखळत सुरुवात करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाने विजयी हॅटट्रिकसह प्लेऑफ्सच्या शर्यतीत आपली दावेदारी भक्कम केली आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जसमोर मात्र आता एक मोठं चॅलेंज निर्माण झाले आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने आतापर्यंत ८ पैकी फक्त २ सामन्यातच  विजय नोंदवला आहे. त्यामुळे हा संघ सर्वात तळाला आहे. इथं जाणून घेऊयात मुंबई इंडियन्ससह चेन्नई सुपर किंग्ससाठी कसं आहे प्लेऑप्सचं समीकरण यासंर्भातील सविस्तर माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

सलग तिसऱ्या विजयासह MI गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर

मुंबई इंडियन्सच्या संघाला पहिल्या ५ सामन्यांपैकी ४ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवातून सावरत मुंबई इंडियन्सच्या संघाने दमदार कमबॅक करताना सलग तिसऱ्या  विजयाची नोंद केली. ८ सामन्यानंतर आता मुंबई इंडियन्सच्या खात्यात ४ विजयासह ८ गुण जमा झाले आहेत. चेन्नई विरुद्ध दिमाखदार विजयासह त्यांनी उत्तम धावगतीसह गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर झेप घेतलीये. 

MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...

उर्वरित ६ सामन्यातील ४ विजयासह मिळू शकते प्लेऑफ्सचे तिकीट

स्वबळावर आयपीएलच्या प्लेऑफ्स गाठण्यासाठी १६ गुण ही मॅजिक फिगर आहे. म्हणजे १४ पैकी ८ सामने जिंकणारा संघाचे प्लेऑफ्समधील स्थान निश्चित होते. काहीवेळा १४ गुणही पुरेसे ठरतात. पण इथं जर तरच्या समीकरणात गोची होण्याची शक्यता असते. उर्वरित ६ सामन्यांपैकी ४ विजय मिळवून मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफ्समध्ये एन्ट्री मारू शकतो. अर्थात त्यांना 'चौकार' पुरेसा ठरेल.

CSK साठी प्रत्येक सामना असेल महत्त्वाचा

चेन्नई सुपर किंग्ज संघ ८ सामन्यानंतर २ विजयासह ४ गुण मिळवत सर्वात तळाला आहे. त्यांची धावगतीही मायनसमध्ये असल्याचे दिसून येते. जर यंदाच्या हंगामात टिकून राहायचे असेल तर साखळी फेरीत उरलेले सर्वच्या  सर्व ६ सामने त्यांना जिंकावे लागतील. राजस्थान रॉयल्स संघाची परिस्थितीतही अगदी CSK प्रमाणेच आहे.  सध्याच्या घडीला हे दोनच संघ डेंजर झोनमध्ये आहेत. ज्यांना सर्वच्या सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.

Web Title: IPL 2025 Playoff Scenario For MS Dhoni Led Chennai Super Kings And Hardik Pandya Mumbai Indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.