Join us

"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

Preity Zinta Angry, Vaibhav Suryavanshi morphed image IPL 2025 PBKS vs RR: सामन्यानंतर प्रिती आणि वैभव यांची भेट झाली, पण फोटोंमध्ये काही वेगळंच दाखवण्यात आलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 18:21 IST

Open in App

Preity Zinta Angry, Vaibhav Suryavanshi morphed image IPL 2025 PBKS vs RR: पंजाब किंग्ज संघाने रविवारी प्लेऑफ्सचे स्थान पक्के केले. प्रथम फलंदाजी करताना नेहाल वढेराच्या ७० आणि शशांक सिंगच्या नाबाद ५९ धावांमुळे पंजाबने २१९ धावांचा पल्ला गाठला. आव्हानाचा पाठलाग करताना, राजस्थानकडून १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने धडाकेबाज फलंदाजी करत १५ चेंडूत ४० धावा कुटल्या. वैभवच्या खेळीचे साऱ्यांनी कौतुक केले. प्रतिस्पर्धी संघाची मालकीण बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने वैभवची भेट घेतली आणि विशेष कौतुक केले. पण काही प्रसारमाध्यमांनी त्या दोघांनी मिठी मारल्याच्या बातम्या दिल्या होत्या. त्यावरून ती भयंकर संतापली.

राजस्थान संघाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काय?

पंजाब किंग्ज विरुद्ध झालेल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने यशस्वी जैस्वालसह दमदार सलामी दिली. वैभव सूर्यवंशीने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक फलंदाजी केली. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि ४ षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेटही २६६.६६ होता. त्याने धावून एकही धाव घेतली नाही. सामन्यानंतर, प्रीती झिंटा वैभव सूर्यवंशीला भेटली. त्यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले. यात ती वैभव सूर्यवंशीचे तोंडभरून कौतुक करताना दिसली.

----

प्रिती झिंटाचा राग अनावर

काही प्रसारमाध्यमांनी प्रीती झिंटाने वैभव सूर्यवंशीला मिठी मारल्याचे वृत्त दिले होते. तसेच काही फोटोही व्हायरल करण्यात आले होते. त्यावरून प्रितीने रिप्लाय दिला आहे. "हा फोटो मॉर्फ केलेला आहे, ही बातमीदेखील खोटी आहे. हल्लीचे न्यूज चॅनेल्स मॉर्फ फोटोंचा वापर करतात आणि त्याच्या बातम्या करून प्रसारित करतात हे खूपच धक्कादायक आहे," असे ट्विट तिने केले आहे.

वैभव सूर्यवंशीची IPL मधील कामगिरी

वैभवने राजस्थानकडून सलामीला उतरून ६ सामन्यात १९५ धावा केल्या आहेत. वैभवने २१९ च्या स्ट्राईक रेटने तुफान फटकेबाजी केली आहे. त्याच्या २०० पेक्षाही कमी धावांमध्ये १४ चौकार आणि तब्बल २० षटकारांचा समावेश करण्यात आला आहे. यात एका शतकाचाही समावेश आहे.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५प्रीती झिंटाराजस्थान रॉयल्सपंजाब किंग्ससोशल मीडियाव्हायरल फोटोज्