IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव

पंजाब किंग्जच्या संघात युजवेंद्र चहलचं कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 20:02 IST2025-06-01T19:40:17+5:302025-06-01T20:02:40+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2025 PBKS vs MI Qualifier 2 Reece Topley Debut For Mumbai IndiansYuzvendra Chahal In Punjab Kings XI | IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव

IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव

IPL 2025 PBKS vs MI Qualifier 2, Reece Topley Debut For Mumbai Indians : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलच्या १८ व्या हंगामातील क्वालिफायर २ चा सामना खेळवण्यात येत आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.  एका बाजूला पंजाबच्या संघात युजवेंद्र चहलचे कमबॅक झाले आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. एलिमिनेटर सामन्यातील विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या रिचर्ड ग्लीसनशिवाय मैदानात उतरण्याची वेळ हार्दिक पांड्याच्या संघावर आली आहे. स्नायू दुखापतीमुळे तो क्वालिफायर २ च्या महत्त्वपूर्ण लढतीसाठी उपलब्ध नाही.  या धक्क्यातून सावरण्यासाठी MI नं १५ सामन्यात बाकावर बसून असलेल्या गड्यावर डाव खेळला आहे.  

१५ सामन्यात बाकावर बसलेल्या गड्याला मिळाली मोठी संधी

एलिमिनेटरमध्ये चमकलेल्या हिरोची उणीव भरून काढण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या संघाने रीस टोपली (Reece Topley) याला पदार्पणाची संधी दिली आहे.  MI फ्रँचायझी संघाने  आयपीएलच्या मेगा लिलावात इंग्लंडच्या या डावखुऱ्या जलदगती गोलंदाजाला ७५ लाख रुपयात आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. ६ फूट ७ इंच उंचीचा हा गडी मागील १५ सामन्यात बाकावर बसून आहे. पण आता मोक्याच्या क्षणी त्याची मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झालीये. ३१ वर्षीय गोलंदाजाने गत हंगामात आरसीबीच्या ताफ्यातून ५ सामन्यात ५ विकेट्स घेतल्या होत्या. MI कडून पदार्पणात तो धमक दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल.   

कशी राहिलीये त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या गोलंदाजाच्या खात्यात ८० विकेट्स आहेत. ३० वनडेत त्याने ४७ विकेट्स घेतल्या असून २४ धावा खर्च करून ६ विकेट्स ही त्याची वनडेतील सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. भारतीय संघाविरुद्धच त्याने ही कामगिरी नोंदवली होती. याशिवाय ३५ आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या खात्यात ३३ विकेट्स जमा आहेत. 

Web Title: IPL 2025 PBKS vs MI Qualifier 2 Reece Topley Debut For Mumbai IndiansYuzvendra Chahal In Punjab Kings XI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.