Join us

डिंपल गर्ल प्रीतीसह पंजाबच्या डगआउटमध्ये 'भांगडा'; पण श्रेयस अय्यरनं जपला धोनीसारखा भाव

ना भावनिक झाला. ना त्याने आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन करण्याचा छंद जोपासला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 12:04 IST

Open in App

Shreyas Iyer  Lead PBKS  IPL 2025 Final : आयपीएलच्या १८ व्या हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जच्या संघाने दुसऱ्या संधीचं सोनं करत क्वालिफायर २ मध्ये २०० पारची लढाई जिंकून फायनल गाठली आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने दिलेल्या २०४ धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्जच्या संघाकडून श्रेयस अय्यरनं उत्तम नेतृत्वासह फलंदाजीतील कर्तृत् दाखवून देत संघाचा फायनलमधील प्रवास निश्चित करण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याने मॅच विनिंग षटकार मारल्यावर डिंपल गर्ल प्रीती झिंटा उड्या मारत विजयाचा आनंद साजरा करताना दिसली. पंजाबच्या डगआउटमध्ये अय्यरच्या संवगड्यांनी अक्षरश: 'भांगडा; केला. पण मुंबई इंडियन्स विरुद्ध शेवटपर्यंत लढणारा सेनापती ना भावनिक झाला. ना त्याने आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन करण्याचा छंद जोपासला. त्याची ही झलक एकदम खास अन् लक्षवेधी अशीच होती.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

...अन् अय्यरमध्ये दिसली धोनीची ती झलक 

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यावर सुरुवातीला तो अगदी संयमी अंदाजात खेळताना पाहायला मिळाले. सेट झाल्यावर गियर बदलून त्याने मोठे फटके मारले. पण शेवटपर्यंत तो एकदम शांत डोक्यानं खेळला. मिळवलेले यश ही एक जबाबदारी असल्याचे दाखवून देणारा मॅचनंतरचा त्याचा अंदाज कॅप्टन कूलची आठवण करून देणारा होता. भारताचा आणि आयपीएलमधील यशस्वी कॅप्टन धोनी इतिहास रचल्यावर कधीच आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन करताना दिसला नाही. त्याने मैदानात कधीच अति उत्साह दाखवल्याचे पाहायला मिळालेले नाही. त्यामुळेच त्याला कॅप्टन कूल असे म्हटले जाते. श्रेयस अय्यरनं फक्त धोनीच्या अंदाजात षटकार मारून मॅच संपवली नाही तर त्याचा अंदाज हा अगदी कॅप्टन कूलच्या धाचणीतील होता.

प्रसिद्ध अभिनेत्याने केलं श्रेयस अय्यरच्या खेळीचं कौतुक, पण तरीही 'या' गोष्टीबाबत व्यक्त केली खंत

प्रीतीचा आनंद गगनात मावेना, पंजाबच्या डगआउटमध्येही जल्लोष

पंजाब किंग्जची सह संघ मालकीण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा पहिल्या हंगामापासून जवळपास  प्रत्येक सामन्यावेळी संघाला चीअर करण्यासाठी स्टँडमध्ये उपस्थितीत असते. ११ वर्षानंतर श्रेयस अय्यरनं पंजाबच्या संघाला फायनलमध्ये नेल्यावर तिचा उत्साह बघण्याजोगा होता. कॅप्टनच्या फिफ्टीनंतर तिने केलेल्या सेलिब्रेशनसह संघाला फायनल तिकीट मिळाल्यावर तिला झालेला आनंद बघण्याजोगा होता. याशिवाय पंजाबच्या डगआउटमध्ये सर्व खेळाडूंनी एकच जल्लोष केल्याचेही पाहायला मिळाले. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५श्रेयस अय्यरपंजाब किंग्सप्रीती झिंटाव्हायरल व्हिडिओ