Join us

IPL 2025 : मॅचसाठी 'ती' नटलीये, पण प्रीतीचा संघ हॅटट्रिकचा डाव साधणाऱ्या मोहऱ्यावर भरवसा दाखवणार का?

सेमीसाठी नटलेली ती अन् ज्याच्यामुळे ती चर्चेत असते त्या पंजाबच्या मोहऱ्यासंदर्भातील खास स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 13:43 IST

Open in App

IPL 2025 PBKS vs MI Qualifier 2 Match Player to Watch Yuzvendra Chahal Punjab Kings : आयपीएलच्या सेमीफायलमध्ये अर्थात क्वालिफायर २ च्या लढतीत पंजाब किंग्जसमोर मुंबई इंडियन्सचे चॅलेंज आहे. पहिली ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी हा अडथळा पार करण्यासाठी संघ कोणता डाव खेळणार ते पाहण्याजोगे असेल. पंजाबचा सामना असला की, संघ मालकीण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटासह आणखी एक सुंदरी लक्षवेधी ठरते. ती पुन्हा एकदा पंजाब किंग्जच्या सामन्यासाठी नटली आहे. पण ती ज्या चेहऱ्यामुळे चर्चेत येते, त्याला या महत्त्वपूर्ण सामन्यात संधी मिळणार का? जर संधी मिळाली तर तो आपली छाप सोडणार का? हा देखील एक चर्चेचा विषय आहे. जाणून घेऊयात सेमीसाठी नटलेली ती अन् ज्याच्यामुळे ती चर्चेत असते त्या पंजाबच्या मोहऱ्यासंदर्भातील खास स्टोरी

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

मॅच आधी 'तो' अन्  इन्स्टा स्टोरीमुळे त्याच्यासोबत 'ती' पुन्हा आली चर्चेत

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जचा संघ हॅटट्रिकचा डाव साधणाऱ्या युजवेंद्र चहलला संधी देणार का? हा मुद्दा चर्चेचा विषय ठरतोय. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात चहलनं साधलेल्या हॅटट्रिकच्या जोरावर पंजाब किंग्जनं कमी धावांचा बचाव करत ऐतिहासिक विजय नोंदवला होता. चहल आयपीएल इतिहासातील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही आहे. त्यामुळेच १८ कोटी मोजून पंजाबच्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात घेतले आहे. पण काही सामन्यात तो बाकावरच बसल्याचे पाहायला मिळाले. सेमीचा सामना जिंकून फायनल गाठण्यासाठी पंजाबचा संघ त्याच्यासह मैदानात उतरेल, अशी अपेक्षा आहे. तो मैदानात उतरण्याआधी त्याच्या कथित गर्लफ्रेंडनं इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून लक्षवेधून घेतले आहे. 

IPL 2025 : पुन्हा 'रोजंदारी'वर मिळालं काम! पण यावेळी MI नं दिला CSK पेक्षा दुप्पट पगार

टीम वर्क मेक ड्रीम वर्क

RJ Mahvash And Yuzvendra Chahal PBKS
युवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा ही जोडी फुटल्यापासून आरजे माहवश हिच्यासोबत फिरकीपटूचे नाव जोडले जात आहे. पंजाब किंग्ज विरुद्धच्या बहुतांश सामन्यात ती चहलसह पंजाब किंग्जच्या संघाला चीअर करण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थिती राहून लक्षवेधून घेताना दिसली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात चहलला संधी मिळणार का? ही चर्चा रंगत असताना तिने आपल्या इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून एक खास स्टोरी शेअर केलीये. "टीम वर्क मेक ड्रीम वर्क" या कॅप्शनसह ती पंजाबच्या संघाला चीअर करण्यासाठी नटल्याचे स्टोरीतून दिसून येते. 

चहलची IPL मधील कामगिरी

चहलनं यंदाच्या हंगामात १२ सामन्यात ३७ षटके गोलंदाजी करताना १४ विकेट्स घेतल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात त्याने  हॅटट्रिकचा डाव साधताना २८ धावा खर्च करत ४ विकेट्स घेतल्या होत्या. ही त्याची यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. याशिवाय कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धही त्याने  ४ विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले. आयपीएल कारकिर्दीत १७२ सामन्यात चहलच्या खात्यात २१९ विकेट्सची नोंद आहे. ४० धावा खर्च करून ५ विकेट्स ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी असून राजस्थान रॉयल्सकडून खेळताना २०२२ मध्ये त्याने पहिली हॅटट्रिक नोंदवत हा डाव साधला होता.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५पंजाब किंग्समुंबई इंडियन्सइंडियन प्रीमिअर लीगयुजवेंद्र चहलटी-20 क्रिकेट