Join us

IPL 2025 : पुन्हा 'रोजंदारी'वर मिळालं काम! पण यावेळी MI नं दिला CSK पेक्षा दुप्पट पगार

मुंबई इंडियन्सच्या संघासाठी ही गोष्ट टेन्शन वाढवणारी अशीच होती. पण परफेक्ट रिप्लेसमेंटसह संघ आता टेन्शन फ्री झाल्याचे दिसते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 11:12 IST

Open in App

IPL 2025 PBKS vs MI Qualifier 2 Match Player to Watch Richard Gleeson Mumbai Indians : आयपीएलच्या १८ व्या हंगामात प्लेऑफ्सआधी MI च्या ताफ्यातील एक-दोन नाही तर तीन भरवशाचे गडी मायदेशी परतले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी दक्षिण आफ्रिकेच्या रायन रिक्लटनसह कॉर्बिन बॉशनं MI ची साथ सोडली. दोघांनीही मुंबई इंडियन्सच्या संघाला प्लेऑफ्समध्ये प्रवेश मिळवून देण्यात मोलाची जबाबदारी बजावली होती. याशिवाय दोन वेळा मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या इंग्लंडच्या विल जॅक्सनंही नॅशनल ड्युटीमुळे घरचा रस्ता धरला. मुंबई इंडियन्सच्या संघासाठी ही गोष्ट टेन्शन वाढवणारी अशीच होती. पण परफेक्ट रिप्लेसमेंटसह संघ आता टेन्शन फ्री झाल्याचे दिसते.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

MI नं खेळलेला डाव ठरला एकदम परफेक्ट

तगड्या भिडूंनी साथ सोडल्यावर MI नं अखेरच्या टप्प्यातील महत्त्वपूर्ण लढतीसाठी परफेक्ट रिप्लेसमेंटचा डाव खेळला अन् हा संघ आता फायनलच्या उंबरठ्यावर आहे. जॉनी बेअरस्टो याने रियान रिकल्टनची कसर भरून काढली. दुसरीकडे गोलंदाजीत रिचर्ड ग्लीसन (Richard Gleeson) चमकला. आयपीएलच्या सेमीफायनलमध्ये (Qualifier 2) मुंबई इंडियन्ससमोर पंजाब किंग्जचा संघ असणार आहे. या सामन्यातही या दोघांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. 

IPL 2025 Purple Cap : प्रसिद्ध टॉपर! पण MI सह RCB च्या ताफ्यातील हुकमी एक्का अजूनही या शर्यतीत

पुन्हा रोजंदारीवर मिळालं काम, MI नं CSK पेक्षा दुप्पट दिला पगार

रिचर्ड ग्लीसन गत हंगामात CSK कडून खेळला होता. त्यावेळीही इंग्लंडच्या या गड्याला डेवॉन कॉन्वेच्या रिप्लेसमेंटच्या रुपात संधी मिळाली होती. पदार्पणाच्या हंगामातील दोन्ही सामने तो पंजाब किंग्ज विरुद्धच खेळला. आता MI च्या ताफ्यातून पंजाबविरुद्ध खास सोडण्यासाठी तो मैदानात उतरेल. पुन्हा एकदा रोजंदारीवर अर्थात तात्पुरत्या बदली खेळाडूच्या स्वरुपात मिळालेली जबाबदारी उत्तमरित्या बजावून तो कायम होण्यासाठी सर्वकाही झोकून देताना दिसतोय. गत हंगामात CSK नं ५० लाख रुपयांसह त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. मुंबई इंडियन्सच्या संघानं १ कोटीसह दुप्पट पगार वाढ देत त्याला आपल्या ताफ्यात घेतले आहे.

IPL मध्ये ३ सामन्यात २ विकेट्स 

मुंबई इंडियन्सकडून एलिमिनेटर लढतीत त्याने साई सुदर्शनच्या रुपात महत्त्वपूर्ण विकेट घेत संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता. आयपीएलमधील तिसऱ्या सामन्यात त्याच्या खात्यात जमा झालेली ही दुसरी विकेट ठरली. गत हंगामात त्याने चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात एक विकेट घेतली होती. प्रभसिमरन सिंगला हा आयपीएलमधील त्याची पहिली शिकार ठरला होता. यंदाच्या हंगामात प्रभसिमरन सिंग धमाकेदार कामगिरी करताना दिसतोय. क्वालिफायर २ च्या लढतीत रिचर्ड ग्लीसन पंजाबच्या सलामीवीराला टेन्शन देऊ शकतो.

वयाच्या ३४ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात दिमाखात पदार्पण,  अशी राहिलीये टी-२० तील कामगिरी

रिचर्ड ग्लीसन याने २०२२ मध्ये वयाच्या ३४ व्या वर्षी टीम इंडियाविरुद्ध आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या पदार्पणाच्या सामन्यात त्याने रोहित शर्मा, विराट कोहली आणि पंत या तिघांना तंबूचा रस्ता दाखवला होता. ६ सामन्यात त्याच्या खात्यात ९ विकेट्स जमा आहेत. एकंदरीत टी-२० कारकिर्दीत त्याने ११५ सामन्यात १२९ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५मुंबई इंडियन्सपंजाब किंग्सइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट