Join us

IPL 2025 : प्रितीनं कोट्यवधी खर्च करून खरेदी केलाय हा 'हिरा'; पण तो चमकणार कधी?

कोण आहे तो खेळाडू अन् पंजाबनं पदार्पणाची संधी दिलेल्या या गड्यावर संघान किती पैसा लावलाय जाणून घेऊयात सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 10:40 IST

Open in App

IPL 2025 PBKS vs DC  66th Match Player to Watch Josh Inglis Punjab Kings : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज संघ यंदाच्या हंगामात धमाकेदार कामगिरी करत आहे. जयपूरच्या मैदानात रंगणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यातील विजयासह प्लेऑफ्समध्ये अव्वल दोनमध्ये राहण्याच्या इराद्याने ते मैदानात उतरतील.  या संघाकडून अनकॅप्ड भारतीय जोडीनं विशेष छाप सोडलीये. प्रियांश आर्य अन् प्रभसिमरन सिंग यांनी यंदाचा हंगाम गाजवलाय. कर्णधार श्रेयस अय्यरही आश्वासक खेळी करतोय. लोअर मिडल ऑर्डरमध्ये शशांकचा तोरा अन् गोलंदाजीत अर्शदीप सिंगच्या जोडीला आता हरप्रीत ब्रार नावाचा मोहरा यामुळे PBKS ची ताकद वाढलीये. याशिवाय या ताफ्यात आणखी एक नवा चेहरा आहे जो पंजाब किंग्जचं पहिल्यांदा ट्रॉफी उचलण्याचं स्वप्न साकार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. कोण आहे तो खेळाडू अन् पंजाबनं पदार्पणाची संधी दिलेल्या या गड्यावर संघान किती पैसा लावलाय जाणून घेऊयात सविस्तर...

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

प्रिती झिंटाच्या पंजाबनं या 'हिरो'वर खेळलाय मोठा डाव

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर जॉश इंग्लिस हा तो खेळाडू. वयाच्या तिशीत पंजाब किंग्जकडून त्याला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळालीये. प्रितीच्या पंजाब संघाने या खेळाडूवर २ कोटी ६० लाखांचा डाव खेळलाय. ऑस्ट्रेलियन विकेट किपर बॅटर हा त्याच्या आक्रमक अंदाजातील फटकेबाजीसाठी ओळखला जातो. पदार्पणाच्या हंगामातील ६ पैकी २ सामन्यात त्याने धमक दाखवली. पण अजूनही अर्धशतकासह शतकी रकाना रिकामाच आहे. उर्वरित सामन्यात संघ त्याच्यावर किती भरवसा ठेवणार अन् तो संधीच सोन करून आपल्यातील क्षमता सिद्ध करण्यात यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल. 

ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच

आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २ शतक, त्यातील एक टीम इंडियाविरुद्ध

जोस इंग्लिस याने २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून टीृ२० सह वनडेत पदार्पण केले. ३० वनडेत त्याच्या खात्यात ३ अर्धशतके आणि एका शतकासह ६७४ धावा जमा आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २९ सामन्यात २ शतकासह त्याने ७०६ धावा कुटल्या आहेत. कसोटीत पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकण्याचा पराक्रमही या भाऊनं करून दाखवलाय. असा पराक्रम करणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरलाय. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील पहिले शतक त्याने टीम इंडियाविरुद्ध झळकावले होते. २०२३ च्या भारत दौऱ्यात विशाखापट्टणमच्या मैदानात त्याच्या भात्यातून ५० चेंडूत ११० धावांची खेळी पाहायला मिळाली होती. याशिवाय मागील वर्षी स्कॉटलंडविरुद्ध त्याने ४९ चेंडूत १०३ धावांची खेळी केल्याचा रेकॉर्ड आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला सुरुवात होण्याआधी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही त्याने शतकी खेळी केली होती. ही आकडेवारी प्रितीनं कोट्यवधी मोजून खरेदी केलेला खेळाडू 'हिरा' हे दर्शवणारी असली तरी पंजाबकडून त्याची चमक दिसणार का? तो संघासाठी हिरो ठरणार का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. 

IPL च्या पदार्पणाच्या हंगामातील जॉस इंग्लिसची कामगिरी

कोलकाता विरुद्धच्या आयपीएल पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना जॉस इंग्लिस ६ चेंडूत फक्त २ धावा करून माघारी फिरला होता. RCB विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात १७ चेंडूत १४ धावा करत त्याने दुहेरी आकडा गाठला. बंगळुरु विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात १७ चेंडूत १७० च्या स्ट्राइक रेटसह त्याने २९ धावांची खेळी करत धमक दाखवली. पण कोलकाता ११ (६) आणि चेन्नई ६(६) स्वस्तात माघारी फिरला. लखनौ विरुद्धच्या सामन्यात १४ चेंडूत ३० धावा करत त्याने २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राक रेटनं धावा कुटल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर खेळताना त्याने ही सर्वोच्च कामगिरी केली होती.  

 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५पंजाब किंग्सदिल्ली कॅपिटल्सइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेटप्रीती झिंटा