Join us

IPL 2025: भाई... हा नशेत आहे का?; अर्जुन तेंडुलकरच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

Arjun Tendulkar Viral Video, IPL 2025: सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याला अद्याप मुंबई इंडियन्सच्या संघात अपेक्षित संधी मिळालेली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 18:03 IST

Open in App

Arjun Tendulkar Viral Video, IPL 2025: टीम इंडियाचा मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने जागतिक क्रिकेट गाजवले. त्याचा मुलगा अर्जुन तेडुलकर वडीलांकडून प्रेरणा घेऊन क्रिकेटर बनला. देशांतर्गत क्रिकेट सामन्यात तो आपली चमक दाखवत असतो. IPL मध्येही त्याला Mumbai Indians संघाने विकत घेतले आहे. गेल्या २-३ वर्षांपासून अर्जुन हा मुंबई इंडियन्सचा भाग आहे. पण त्याला अपेक्षित संधी मिळाली नाही. यंदाच्या हंगामात मुंबईने विघ्नेश पुथूर, अश्वनी कुमार यांसारख्या नवख्या खेळाडूंना संधी दिली. पण अर्जुन अद्यापही बाकावरच बसला आहे. त्याला संधी कधी मिळणार, याबाबत सतत विचारणा होत असते. याचदरम्यान अर्जुनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर चाहते विविध कमेंट करताना दिसत आहेत.

अर्जुन तेंडुलकरच्या एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओमध्ये तो एका कॅफेमधून बाहेर पडून त्याच्या गाडीत बसायला जातो. यादरम्यान, तो घाईघाईत चालत असल्याचे दिसून येते आणि त्याच घाईगडबडीत तो गाडीच्या दारालाही धडकतो. अर्जुन सध्या मुंबईतच असून या व्हिडीओ मुंबईतील एखाद्या कॅफेचा असल्याची चर्चा आहे. अर्जुनच्या चालण्यावरून त्याच्याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. पाहा व्हायरल व्हिडीओ-

अशा परिस्थितीत चाहत्यांनी या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, 'तो (दारू) प्यायलेला आहे का?' त्याच वेळी, एका चाहत्याने लिहिले आहे की, 'तो नशेत आहे का?' एका चाहत्याने तर असेही लिहिले आहे की, 'अॅटिट्यूड असा आहे की आजचा सामना हाच जिंकवणार आहे.' परंतु अर्जुन कधीही त्याच्यावर होणाऱ्या टीकेकडे लक्ष देत नाही. तसेच कधीही कोणतीही प्रतिक्रिया देत नाही.

दरम्यान, आयपीएल सुरु असतानाही अर्जुन तेंडुलकर चांगले काम करताना दिसला. आई गमावलेल्या एका कुत्र्याच्या पिल्लाला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी त्याने पुढाकार घेतला. अर्जुन तेंडुलकरने इन्स्टा स्टोरीमध्ये कुत्र्याशी संबंधित सर्व माहिती शेअर केली आहे आणि लोकांना आवाहन केले आहे की या पिल्लाला दत्तक घेऊन हक्काचे घर द्यावे.

टॅग्स :अर्जुन तेंडुलकरइंडियन प्रिमियर लीग २०२५मुंबई इंडियन्सव्हायरल व्हिडिओसोशल मीडियासोशल व्हायरल