मुंबईतील वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांसमोर टिचून गोलंदाजी केली. पहिल्या षटकात दोन्ही सलामीरांचे झेल सुटल्यामुळे पॉवर प्लेमध्ये उत्तम गोलंदाजी करूनही मुंबई इंडियन्सच्या संघाला एकही विकेट मिळाली नाही. हैदराबादच्या सलामीवीरांनी धीम्या गतीने पॉवर प्लेमध्ये ४६ धावा केल्यावर सातव्या षटकात अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पांड्यानं ट्रॅविस हेडची विकेट घेतली, सेलिब्रेशन झाले अन् सायरन वाजला
आठव्या षटकात हार्दिक पांड्या गोलंदाजीला आला अन् त्याने ही जोडी फो़डली अभिषेक शर्माच्या रुपात पांड्याने संघाला पहिले यश मिळवून दिले. पुढच्या षटकात विल जॅक्सनं इशान किशनला तंबूत धाडत हैदराबादच्या अडचणी वाढवल्या. पुन्हा पांड्या आला अन् त्याने डोकेदुखी ठरू शकेल अशा ट्रॅविस हेडलाही आपल्या जाळ्यात अडकवले. या विकेटच हार्दिक पांड्याने जोरदार सेलिब्रेशन केले. ट्रेविस हेडही मान खाली घालून पॅव्हेलियनच्या दिशेने निघाला. पण तोपर्यंत नो बॉलचा सायनर वाजला. ट्रॅविस हेडला एक संधी मिळाली.
IPL 2025 MI vs SRH : काय करायचं त्या बॉलरनं? दीपक चाहरनं जोर लावला! पण...
दोन चेंडूवर दोन वेळा विकेट
सनरायझर्स हैदराबादच्या डावातील १० व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ट्रेविस हेडनं मोठा फटका मारला. डिप मिड विकेटला फिल्डिंग करत असलेल्या जॅक विल्सनं कॅचही घेतला. हार्दिक पांड्याने मैदानात जोरदार सेलिब्रेशन साजरे केले. ट्रॅविस हेडही पॅव्हेलियनच्या दिशेने जाताना दिसले. पण सायनर वाजला अन् नो बॉल असल्यामुळे त्याला पुन्हा खेळण्याची संधी मिळाली. फ्री हीटवरही तो झेलबाद झाला. पण या संधीच तो काही सोनं करू शकला नाही. ४ धावांची भर घालून तो २८ धावांवर तंबूत परतला. पांड्याऐवजी त्याची विकेट विल जॅक्सच्या खात्यात जमा झाली.
Web Title: IPL 2025 MI vs SRH Hardik Pandya Dismissed Travis Head But The Umpire Called It A No Ball
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.