IPL 2025 MI vs RCB Virat Kohli Record First Indian To Reach 13,000 T20 Runs : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा स्टार बॅटर विराट कोहली याने टी-२० क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. ३६ वर्षीय किंग कहोलीनं या सामन्यात १७ धावा पूर्ण करताच त्याने टी २० मध्ये १३,००० धावांचा पल्ला पार केला. टी-२० मध्ये हा पल्ला गाठणारा तो पहिला भारतीय बॅटर ठरला असून क्रिकेट जगतातील तो पाचवा फलंदाज आहे ज्याने १३ हजार धावांचा पल्ला पार केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोहलीनं गाठला १३,००० धावांचा पल्ला; जलदगतीनं इथंपर्यंत पोहचणारा ठरला दुसरा बॅटर
कोहलीने ३८६ व्या टी-२० डावात हा मैलाचा पल्ला गाठला. वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेल याच्यानंतर जलदगतीने १३ हजार धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरलाय. गेलने ३८१ डावांमध्ये १३,००० धावा पूर्ण केल्या होत्या. कोहलीने इंग्लंडच्या अॅलेक्स हेल्सला मागे टाकत सर्वात जलगतीने हा पल्ला गाठण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. दुसरा फलंदाज ठरला आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये फक्त ५ फलंदाजांनी केलीये अशी कामगिरी
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा ख्रिस गेलच्या नावे आहे. ३८१ डावात १३ हजार धावांचा पल्ला गाठणाऱ्या गेलनं आपल्या टी-२० कारकिर्दीत १४ हजार५६२ धावा केल्या आहेत. त्याच्यापोठापाठ या यादीत इंग्लंडचा अॅलेक्स हेल्सचा नंबर लागतो. त्याने ४७४ डावात १३ हजार धावांचा टप्पा पार करणाऱ्या बॅटरच्या खात्यात एकूण १३६१० धावा जमा आहेत. पाकिस्तानच्या शोएब मलिक याने हा पल्ला गाठण्यासाठी ४८७ वेळा बॅटिंग केली होती. त्याच्या खात्यात १३५५७ धावांची नोंद आहे. केरॉन पोलार्ट १३५३६ धावांसह या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. कॅरेबियन दिग्गजाने ५९४ डावात १३ हजार धावा करण्याचा डाव साधला होता.