Join us

MI चा वाघ! तिलक वर्मानं कडक फिफ्टीसह काढला Retired Out केल्याचा राग!

लखनौ विरुद्धच्या सामन्यात बॅटला बॉल लागेना म्हणून सोडावे लागले होते मैदान, आरसीबी विरुद्धच्या सामन्यात पेश केला फटकेबाजीचा खास नजराणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 23:20 IST

Open in App

मुंबई येथील वानखेडेच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघानं दिलेल्या २०० पारच्या लढाईत तिलक वर्मानं तुफान फटकेबाजीचा नजराना पेश करत २६ चेंडूत अर्धशतक झळकावले. आरसीबी विरुद्धच्या सामन्यात त्याच्या भात्यातून एक से बढकर एक फटका पाहायला मिळाला. यात अप्रतिम रिव्हर्स स्वीपचाही समावेश होता. लखनौ विरुद्धच्या सामन्यात त्याच्यावर मोठे फटकेबाजी होईन म्हणून रिटायर्ड आउट करण्याचा निर्णय घेतला गेला होता. हा मुद्दा चांगलाच गाजला. आता त्याने जबरदस्त खेळीसह त्या निर्णयाचा राग आरसीबी विरुद्ध काढल्याचे पाहायला मिळाले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

मुंबई इंडियन्सच्या हातून मॅच निसटलीये असे वाटत असताना तिलक वर्मानं कर्णधार हार्दिक पांड्याच्या साथीनं ५ व्या विकेटसाठी ८९ धावांची खेळी केली. १८ व्या षटकात मोठी फटकेबाजी करताना आुट होण्याआधी त्याने २९ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ५६ धावांची खेळी केली. १९३. १० च्या स्ट्राइक रेटन धावा काढल्या. त्याची ही खेळी दमदार आणि मागच्या सामन्यात जे घडलं ते चुकीचं होते ते दाखवणारी होती. 

Tilak Varma Retired Out : आयपीएलमध्ये अशा पद्धतीने आउट होणारा चौथा फलंदाज ठरला तिलक वर्मा

लखनौ विरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकात तिलक वर्मासंदर्भात जे घडलं ते या बॅटरला अपमानित केल्यासारखेच होते.  प्रत्येक दिवशी भात्यातून मोठी फटकेबाजी होईलच असे नाही. कदाचित तो दिवस त्याचा नव्हता. याचा अर्थ त्याला बाहेर पाठवून नव्या भिडूला बॅटिंगला बोलवण्याचा निर्णय खटकणाराच होता. बरं ते केल्यावरही त्याच्या जागी आलेल्या बॅटरनं काही चमत्कार केला नाही. एवढेच काय तर स्ट्राइकवर असलेल्या हार्दिक पांड्यालाही अखेरच्या षटकात मोठी फटकेबाजी करता आली नव्हती.  पण आता तिलक वर्मानं पुन्हा एकदा आपल्यातील धमक दाखवून दिलीये.  त्याचा हा अंदाज कायम राहावा, हीच मुंबई इंडियन्सची ही अपेक्षा असेल.  

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५मुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरतिलक वर्माहार्दिक पांड्या