Join us

...अन् दुसऱ्या प्रयत्नात सूर्यकुमार यादव ठरला MI चा टॉपर! सचिनचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

याआधी २०२३ च्या हंगामात तो सचिनच्या विक्रमाच्या जवळ पोहचला होता. पण ६१८ धावांचा पल्ला पार करण्यात तो अपयशी ठरला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 23:09 IST

Open in App

 IPL 2025 MI vs PBKS Suryakumar Yadav Breaks Sachin Tendulkars Record Most Runs For MI :  मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पाचवे अर्धशतक झळकावले. ३९ चेंडूतील ५७ धावांच्या खेळीसह तो या सामन्यात MI कडून टॉपर राहिलाच. पण याशिवाय त्याने या फ्रँचायझी संघाकडून आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही आपल्या नावे केला आहे. याआधी हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे होता. २०१० च्या हंगामता सचिन तेंडुलकरनंमुंबई इंडियन्सच्या संघाकडून ६१८ धावा करत ऑरेंज कॅप पटकावली होती. हा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढत सूर्यकुमार यादवनं यंदाच्या हंगामातील ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आपली दावेदारी भक्कम केलीये.  दुसऱ्या प्रयत्नात तो MI चा टॉपर झालाय. याआधी २०२३ च्या हंगामात तो सचिनच्या विक्रमाच्या जवळ पोहचला होता. पण ६१८ धावांचा पल्ला पार करण्यात तो अपयशी ठरला होता.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

यंदाच्या हंगामात ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर आहे सूर्या

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात १४ सामन्यात सातत्यपूर्ण खेळीसह सूर्यकुमार यादवनं आपल्या खात्यात ६४० धावा जमा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत शुबमन गिल आणि साई सुदर्शन ही दोघे त्याच्या पुढे आहेत. साईनं १४ सामन्यातील १४ डावात ६७९ धावा केल्या आहेत. सध्याच्या घडीला ऑरेंज कॅपही त्याच्याकडेच आहे. त्याच्यापाठोपाठ शुबमन गिल याने १४ सामन्यातील १४ डावात ६४९ धावा केल्या आहेत. 

"रोहितची बॅटिंग बघून असं वाटतंय की, तो गंभीर अन् गिलला इम्प्रेस करायचा प्रयत्न करतोय"

मुंबई इंडियन्सकडून एका हंगामात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  • ६४०* - सूर्यकुमार यादव (२०२५)
  • ६१८ - सचिन तेंडुलकर (२०१०)
  • ६०५ - सूर्यकुमार यादव (२०२३)
  • ५५३ - सचिन तेंडुलकर (२०११)
  • ५४० - लेंडल सिमन्स (२०१५)
  • ५३८ - रोहित शर्मा (२०१३)

 

पाच वेळा ट्रॉफी आली, पण सचिननंतर कुणीच ऑरेंज कॅपची शर्यत नाही जिंकली

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने २०१० च्या हंगामात १५ सामन्यात ६१८ धावा करत ऑरेंज कॅप पटकावली होती. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाने पाच वेळा ट्रॉफी जिंकली. पण एकाही बॅटरला ऑरेंज कॅप पटकवता आलेली नाही. सूर्यकुमार उर्वरित सामन्यात आपला फॉर्म कायम राखत हा डावही साधणार का? ते पाहण्याजोगे असेल.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५मुंबई इंडियन्ससूर्यकुमार अशोक यादवसचिन तेंडुलकरइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट