Join us

"रोहितची बॅटिंग बघून असं वाटतंय की, तो गंभीर अन् गिलला इम्प्रेस करायचा प्रयत्न करतोय"

पंजाब विरुद्धच्या सामन्यात हिटमॅनची स्लो खेळी, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 21:00 IST

Open in App

आयपीएलच्या १८ व्या हंगामातील ६९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज हे दोन संघ प्लेऑफ्समधील अव्वल दोनमध्ये पोहचण्याच्या इराद्याने जयपूरच्या मैदानात उतरले आहेत. पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर रायन रिकल्टन आणि रोहित शर्मा या जोडीनं मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी पावरप्लेमध्ये अगदी संयमी खेळ केल्याचे पाहायला मिळाले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

..अन् रोहितची स्लो खेळी पाहून बिशप यांना सुचली गंमत

नेहमी आक्रमक अंदाजात खेळणाऱ्या रोहित शर्माचा संयमी खेळी पाहून इंग्लिश कॉमेंट्री पॅनलचा भाग असलेल्या वेस्ट इंडिजचे दिग्गज इयान बिशप यांनी गंमतीशीर कमेंट केल्याचे पाहायला मिळाले. रोहितच्या स्लो खेळीवर कमेंट करताना ते म्हणाले की, "मला वाटतंय की, रोहित शर्मा हा गौतम गंभीर आणि शुबमन गिलला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतोय." इंग्लंड दौऱ्याआधी रोहित शर्मानं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. हे सर्वांनाच माहिती आहे. पण त्याची पंजाबविरुद्धची स्लो खेळी बघून बिशप यांनी हसत हसत ही मजेशीर कमेंट केल्याचे पाहायला मिळाले.

IPL 2025 : ८ सामन्यात ७ सामनावीर! ना पांड्या ना बुमराह MI च्या ताफ्यातून या गड्यानं दोन वेळा मारली बाजी

आधी रिकल्टन मग सेट झाल्यावर रोहितही फसला

रिकल्टनच्या रुपात सहाव्या षटकातच मुंबई इंडियन्सला पहिला धक्का बसला. रायन रिकल्टन २० चेंडूत २७ धावा करून माघारी फिरला. त्याने ५ चौकार मारत १३५ च्या स्ट्राइक रेटनं धावा कुटल्या. दुसऱ्या बाजूला पहिल्यापासून आक्रमक अंदाजात खेळणाऱ्या रोहित शर्मानंही अगदी संयमी खेळ दाखवला. सेट झाल्यावर मोठी फटकेबाजी करण्याचा त्याचा प्रयत्न फसला अन् ब्रारनं त्याची विकेट घेतली. रोहित शर्मानं २१ चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २४ धावा केल्या. यावेळी त्याचे स्ट्राइक रेट हे १११४.२९ एवढे होते. १० व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रोहित शर्मा झेलबाद झाला. नेहल वढेरानं त्याचा सर्वोत्तम झेल टिपला.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५रोहित शर्मामुंबई इंडियन्सपंजाब किंग्सइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट