Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला

जाणून घेऊयात हिटमॅनच्या खास कामगिरीसंदर्भात सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 22:04 IST2025-04-27T22:03:00+5:302025-04-27T22:04:55+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 MI vs LSG Rohit Sharma Becomes 3rd Opener Player To Hit Two Sixes Off The First Two Balls Of Their Innings After Virat Kohli And Yashasvi Jaiswal | Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला

Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबईतील इंडियन्सच्या संघाने वानखेडेच्या घरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाला एकहाती पराभूत करत दिमाखदार विजय नोंदवला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सच्या संघाने २०१५ धावा केल्या होत्या. रोहित शर्मानं या सामन्यात दोन षटकार मारत दमदार सुरुवात केली. पण याच षटकात त्याने विकेटही फेकली. सलग दोन अर्धशतके झळकावल्यानंतर लखनौ विरुद्ध तो ५ चेंडूत १२ धावा करून तंबूत परतला. या छोट्याखानी खेळीतही रोहितनं खास विक्रमाला गवसणी घातली आहे. दोन बॅक टू बॅक सिक्सरच्या जोरावर त्याने विराट कोहलीसहयशस्वी जैस्वालच्या विक्रमाशी बरोबरी केलीये. जाणून घेऊयात हिटमॅनच्या खास कामगिरीसंदर्भात सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

मयंक यादवच्या गोलंदाजीवर सलग दोन षटकार अन्...

लखनौ विरुद्धच्या सामन्यात रायन रिकल्टन आणि रोहित शर्मा या जोडीनं मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात केली. पहिल्या दोन षटकात रोहितला स्ट्राइकच मिळाले नाही. तिसऱ्या षटकात तो स्ट्राइकवर आला. या षटकात मयंक यादवने पहिला चेंडू वाइड टाकला. त्यानंतर टाकलेल्या १४१ kph वेगाने टाकलेल्या चेंडूवर रोहित शर्मानं ६२ मीटर लांब षटकार मारत खाते उघडले. दुसऱ्या चेंडूवरही रोहितनं षटकार मारला. स्क्वेअर लेगच्या दिशेनं मारलेला हा षटकार ७७ मीटर लांब अतंरावर जाऊन पडला. याच षटकात पाचव्या चेंडूवर रोहित झेलबाद होऊन परतला. पण या दोन षटकारासह त्याने खास विक्रम आपल्या नावे नोंदवला.

MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

 IPL मध्ये सलग दोन षटकार मारणारा तिसरा सलामीवीर ठरला रोहित

आयपीएलमध्ये डावातील पहिल्या दोन चेंडूवर षटकार मारणारा रोहित शर्मा हा तिसरा सलामीवीर ठरला आहे. याआधी विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांनी अशी कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले होते. विराट कोहलीनं २०१९ च्या हंगामात राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात डावाची सुरुवातही बॅक टू बॅक दोन षटकारांसह केली होती. २०२३ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातून खेळताना यशस्वी जैस्वालनं कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात असा तोरा दाखवला होता. 
  
IPL मध्ये पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसरा 

रोहित शर्मानं लखनौ विरुद्धच्या सामन्यात  दोन षटकार मारत पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वॉर्नरला मागे टाकले. IPL मध्ये पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा आता दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत ख्रिस गेल टॉपला आहे.

आयपीएलमध्ये पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

  • ख्रिस गेल - १४३ षटकार
  • रोहित शर्मा - १०७ षटकार
  • डेविड वॉर्नर - १०५ षटकार
  • क्विंटन डि कॉक -८२ षटकार
     

Web Title: IPL 2025 MI vs LSG Rohit Sharma Becomes 3rd Opener Player To Hit Two Sixes Off The First Two Balls Of Their Innings After Virat Kohli And Yashasvi Jaiswal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.