IPL 2025 : विकेट्स मिळवून देण्याची हमी! MI चा भिडू आधी कमी पडला; पण आता तो ट्रॅकवर आलाय

इथं जाणून घेऊयात ट्रेंट बोल्टची यंदाच्या हंगामातील कामगिरी अन् तो संघासाठी कसा ठरू शकतो उपयुक्त यासंदर्भातील सविस्तर माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 11:03 IST2025-04-27T10:59:06+5:302025-04-27T11:03:38+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 MI vs LSG 45th Match Lokmat Player to Watch Trent Boult Mumbai Indians | IPL 2025 : विकेट्स मिळवून देण्याची हमी! MI चा भिडू आधी कमी पडला; पण आता तो ट्रॅकवर आलाय

IPL 2025 : विकेट्स मिळवून देण्याची हमी! MI चा भिडू आधी कमी पडला; पण आता तो ट्रॅकवर आलाय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 MI vs LSG 45th Match Player to Watch Trent Boult Mumbai Indians :  मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स या दोन संघात यंदाच्या हंगामातील ४५ वा सामना खेळवण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रातील या लढतीत मुंबई इंडियन्स संघासमोर यंदाच्या हंगामातील पराभवाची परफेड करण्यासह प्लेऑफ्सच्या शर्यतीतील आपले स्थान अधिक भक्कम करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. आयपीएलमध्ये दोन्ही संघ ७ वेळा समोरासमोर आले असून लखनौच्या संघाने पाच वेळच्या चॅम्पियन संघाला ६ वेळा पराभूत करून दाखवले आहे. आघाडीच्या फळीतील फलंदाज ही लखनौची ताकद आहे. त्याला सुरुंग लावण्याची मोठी जबाबदारी ट्रेंट बोल्टवर असेल. इथं जाणून घेऊयात ट्रेंट बोल्टची यंदाच्या हंगामातील कामगिरी अन् तो संघासाठी कसा ठरू शकतो उपयुक्त यासंदर्भातील सविस्तर माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

पहिल्या टप्प्यात छाप सोडण्यात कमी पडला बोल्ट

न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्ट हा पहिल्या षटकात विकेट घेण्यात माहिर आहे. एवढेच नाही तर पॉवर प्लेमध्ये तो प्रतिस्पर्धी संघाला धक्क्यावर धक्के देण्यासाठी उपयुक्त ठरतो. पण यंदाच्या हंगामात पहिल्या ८ सामन्यात त्याचा हा तोरा दिसलाच नाही.  CSK विरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो विकेट लेस राहिला. पहिल्या टप्प्यात तो छाप सोडण्यात कमी ठरला. परिणामी संघही अडखळताना दिसला. पण आता संघातील प्रत्येक खेळाडूचा तोरा बदललाय. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा आणि जसप्रीत बुमराहसह तोही ट्रॅकवर परतलाय. ही मुंबईची जमेची बाजू आहे. 

Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)

स्लो स्टार्टनंतर पकडलीये गती

सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याने कमालीची गोलंदाजी करत ४ विकेट्स घेतल्या. स्लो स्टार्टनंतर आता त्याने गती पकडली आहे. कामगिरीतील सातत्य कामय ठेवून तो आपल्या भेदक माऱ्यासह संघाला चांगली सुरुवात करून देऊ शकतो. सुरुवातीच्या षटकासह डेथ ओव्हरमध्येही तो प्रतिस्पर्धी संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो. तो लयीत परतल्यामुळे मुंबई इंडियन्सची ताकद वाढली आहे. मार्करम, मार्श आणि निकोलस पूरन यांना रोखण्यात तो यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.

बोल्टची यंदाच्या हंगामातील कामगिरी

पहिल्या ८ सामन्यात फक्त ६ विकेट्स खात्यात जमा असलेल्या ट्रेंट बोल्टनं नवव्या सामन्यात ४ विकेट्स घेत आपल्या खात्यात १० विकेट्स जमा केल्या आहेत. उर्वरित सामन्यात तो आपला हाच ट्रेंड कामय ठेवून संघासाठी उपयुक्त कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे. 

Web Title: IPL 2025 MI vs LSG 45th Match Lokmat Player to Watch Trent Boult Mumbai Indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.