IPL 2025 MI vs KKR 12th Match Player to Watch Venkatesh Iyer Kolkata Knight Riders : आयपीएलच्या १८ व्या हंगामाआधी झालेल्या मेगा लिलावात शाहरुख खानच्या मालकीच्या KKR फ्रँचायझी संघानं व्यंकटेश अय्यरवर मोठी बोली लावली. या ऑल राउंड खेळाडूला २३.७५ कोटीचा प्राइज टॅग लागल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या. शाहरुखच्या संघानं चुकीच्या अय्यरवर पैसा लावलाय का? असा प्रश्नही अनेकांना पडला. यामागचं कारण गत हंगामात ज्या श्रेयस अय्यरनं संघाला चॅम्पियन केलं त्याला रिलीज करून केकेआरच्या संघानं व्यंकटेश अय्यरसाठी मोठी रक्कम मोजली. एवढी मोठी रक्कम मोजल्यावर तोच या संघाचा कर्णधार होणार अशी चर्चा रंगली. मग यातही एक नवीन ट्विस्ट आला अन् स्वस्तात मस्त अजिंक्य रहाणेला कर्णधार करत KKR च्या संघानं आयपीएलच्या इतिहासातील तिसऱ्या सर्वात महागड्या खेळाडूकडे उप कर्णधारपदाची जबाबदारी दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'हार्ड हिटर' मौल्यवान खेळाडूसाठी 'अजिंक्य' कवच सुरक्षा
आयपीएलच्या मेगा लिलावात शेवटच्या टप्प्यात अनसोल्ड राहिलेल्या अजिंक्य रहाणेवर किंमत देत कोलकाता नाईट रायडर्संनं त्याच्यावर लावलेला डाव हा मोल्यवान खेळाडूसाठी सुरक्षा कवच दिल्यासारखाच आहे. व्यंकटेश अय्यरला मोठी प्राइज टॅग लावल्यामुळे त्याच्यावर एक वेगळा दबाव असेल. त्यात कॅप्टन्सीचं ओझं त्याच्या खांद्यावर दिले तर त्याच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. कदाचित हीच गोष्ट लक्षात घेऊन कोलकाता नाईट रायडर्सनं आपल्या 'हार्ड हिटर'ला त्याचा तोरा 'अजिंक्य' ठेवता यावा यासाठी रहाणेच्या खांद्यावर जबाबदारी दिल्याचे दिसते. याशाविया रहाणेच्या नेतृत्वाखाली त्याला नेतृत्व गुणही विकसित करण्याची एक संधी मिळेल.
IPL 2025 RR vs KKR : अजिंक्य रहाणे- 'द ॲक्सिडेन्टल कॅप्टन' संदर्भातील काही 'इनक्रेडिबल' गोष्टी
शाहरुख खानच्या संघासाठी तो एवढा 'मौल्यवान' कसा झाला?
व्यंकटेश अय्यर हा स्फोटक फलंदाजीसह गोलंदाजीत मोक्याच्या क्षणी संघाला विकेट मिळवून देण्याची क्षमता असणारा खेळाडू आहे. २०२१ च्या हंगामात आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासून तो केकेआरसाठी हिरोगिरी करताना दिसतोय. कामगिरीतील सातत्यामुळेच तो या फ्रँचायझीसाठी मौल्यवान झालाय. २०२१ च्या आयपीएल हंगामात १० सामन्यात ४१.११ च्या स्ट्राइक रेटनं ३७० धावा कुटतं त्याने झोकात पदार्पण केले होते. ज्यात ४ अर्धशतकांचा समावेश होता. या कामगिरीनं पुढच्या तीन हंगामात तो ८ कोटींचा गडी झाला. २०२२ च्या हंगामातील १२ सामन्यातील १८२ धावांची कामगिरी वगळली तर २०२३ आणि २०२४ मध्ये त्याने अनुक्रमे ४०४ आणि ३७० धावांच्या योगदानासह आपली उपयुक्तता सिद्ध केली. आता २३.७५ कोटींसह रिषभ पंत (२७ कोटी) आणि श्रेयस अय्यर (२६.७५ कोटी) यांच्या पंक्तीत जाऊन बसलाय.
पैसा वसूल कामगिरी करून दाखवण्याचे चॅलेंज निभावणार?
कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं नेतृत्वाच्या जबाबदारीपासून त्याला दूर ठेवत भविष्यात यासाठी तयार करण्याचा डाव खेळलाय. पण प्राइज टॅगमुळे त्याच्यावर एक वेगळा दबाव निश्चित असेल. मॅच वेळी दबावात खेळताना त्याने दबावात आपल्या भात्यातील कर्तृत्व निभावले आहे. यावेळी प्राइज टॅगचं चॅलेंज तो कसं निभावतो ते पाहण्याजोगे असेल.
Web Title: IPL 2025 MI vs KKR 12th Match Lokmat Player to Watch Venkatesh Iyer Kolkata Knight Riders
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.