मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात जसप्रीत बुमराहनं मोक्याच्या क्षणी सेट झालेल्या शुबमन गिलची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. पहिल्या स्पेलमधील दोन षटकात जसप्रीत बुमराहनं अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. शुबमन गिलनंही त्याच्या गोलंदाजीला सन्मान देत सावध खेळण्याला पसंती दिली. पावसामुळे खेळ थांबल्यावर पुन्हा खेळ सुरु झाल्यावर दुसऱ्या स्पेलमधील पहिल्या षटकात बुमराह पुन्हा गोलंदाजीला आला. या षटकात गिलनं त्याला एक चौकार मारला. या षटकात एका अप्रतिम स्विंगवर बुमराहनं गिलच्या खेळीला ब्रेक लावला. या विकेटमुळे गुजरातच्या बाजूनं सेट झालेला सामना पुन्हा मुंबई इंडियन्सच्या बाजूनं झुकला. अखेरच्या षटकातही बुमराहनं शाहरुख खानची विकेट घेत सामन्यात ट्विस्ट आणले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!