Join us

IPL 2025 : मुंबई इंडियन्सनं १४.२५ कोटींच्या बचतीसह केलेल्या स्वस्तात मस्त शॉपिंगची गोष्ट

MI नं काही डोळे झाकून त्याच्यावर डाव खेळला नव्हता. जाणून घेऊयात त्याच्यावर भरवसा ठेवण्यामागची खास स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 12:46 IST

Open in App

IPL 2025 MI vs GT 56th Match Player to Watch Ryan Rickelton Mumbai Indians Mumbai Indians : आयपीएलच्या यंदाच्या हंगामा आधी मुंबई इंडियन्सच्या संघाने इशान किशनला रिलीज करण्याचा मोठा निर्णय घेतला. १५.२५ कोटी रुपयांच्या गड्याची जागा भरून काढण्यासाठी MI फ्रँचायझी संघाने १ कोटी रुपयांसह दक्षिण आफ्रिकेच्या विकेट किपर बॅटर रायन रिकल्टन याच्यावर डाव खेळला होता. CSK विरुद्धच्या सामन्यात त्याला IPL पदार्पणाची संधीही मिळाली. पण या सामन्यासह गुजरात टायटन्स विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही तो अडखळला. त्याच्यासह संघाची सुरुवात खराब झाली. पण संघाने त्याच्यावर भरवसा कायम ठेवला अन् त्याचा चांगला रिझल्ट मिळाला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

...अन् त्याच्या रुपात MI नं १४.२५ कोटींच्या बचतीसह केली स्वस्तात मस्त शॉपि

आयपीएलच्या पदार्पणाच्या हंगामातील ११ सामन्यात रायन रिकल्टन याने १५३.९२ च्या सरासरीनं ३ अर्धशतकाच्या मदतीने ३३४ धावा केल्या. या बॅटरची ही कामगिरी म्हणजे मुंबई इंडियन्सनं १४.२५ कोटींच्या बचतीसह त्याच्या रुपात  मेगा लिलावात केलेली स्वस्तात मस्त शॉपिंग ठरलीये. पण MI नं काही डोळे झाकून त्याच्यावर डाव खेळला नव्हता. जाणून घेऊयात त्याच्यावर भरवसा ठेवण्यामागची खास स्टोरी

IPL 2025 : MI च्या ताफ्यातील एका दोघांसमोर नव्हे तर या चौघांसमोर तो '५६ इंचाची छाती' घेऊन मिरवतो!

दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० लीगमध्ये दाखवली धमक

दक्षिण आफ्रिकेच्या रायन रिकल्टन याने यंदाच्या हंगामातून मुंबई इंडियन्सच्या संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. याआधीच तो दक्षिण आफ्रिकेतील टी-२० लीगमधून मुंबई इंडियन्स फ्रँचायझी संघासोबत कनेक्ट झाला होता. २०२३-२४ च्या SA टी-२० लीगच्या हंगामातून त्याने मुंबई इंडियन्स केपटाउन संघाकडून पदार्पण केले. या स्पर्धेतील पदार्पणाच्या हंगामात सर्वाधिक ५ अर्धशतकासह त्याने १० सामन्यातील १० डावात स्पर्धेत सर्वाधिक ५३० धावा केल्या. या कामगिरीसह त्याने आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या संघातील आपली सीट बूक केली. भरवशाचा विकेट किपर बॅटर मिळाल्यावर मुंबई इंडियन्सच्या संघाने १५.२५ कोटींसह खेळणाऱ्या इशान किशनला नारळ दिला. १ कोटींसह या गड्यावर डाव खेळून मुंबई इंडियन्सनं खेळलेली चाल एकदम परफेक्ट ठरलीये. 

स्वस्तात मस्त शॉपिंगमुळे MI चं मोठं टेन्शन दूर झालं

आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी झालेल्या मेगा लिलावा आधी मुंबई इंडियन्सच्या संघानं जसप्रीत बुमराह (१८ कोटी), हार्दिक पांड्या (१६.३५ कोटी), सूर्यकुमार यादव (१६.३५ कोटी), आणि रोहित शर्मा (१६.३० कोटी) या स्टार खेळाडूंना कायम ठेवताना तिलक वर्मासाठीही ८ कोटी रक्कम मोजली. हे गणित जुळवूनं MI साठी मोठं टास्कच होते. १५.२५ कोटी प्राइज टॅगच्या इशान किशनच्या रिप्लेसमेंटच्या रुपात रायन रिकल्टन फक्त १ कोटी रुपयांमध्ये  मिळाल्यामुळे हे टेन्शन सहज दूर झाल्याचे पाहायला मिळाले होते.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५मुंबई इंडियन्सगुजरात टायटन्सइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट