मुंबई येथील वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सला रोखत प्लेऑफ्समध्ये एन्ट्री मारली. संघाच्या विजयात सूर्यकुमार यादवनं मोलाटा वाटा उचलला. आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यावर सूर्यकुमार यादवनं ४३ चेंडूत ७३ धावांची नाबाद खेळी करत दिल्लीसमोर आव्हानात्म धावसंख्या उभारली. त्याच्या या खेळीमुळेच मुंबई इंडियन्सला प्लेऑफ्सचं तिकीट मिळाले. सातत्यपूर्ण खेळीसह हंगाम गाजवणाऱ्या सूर्यकुमार यादवची यंदाच्या हंगामातील ही सर्वोच्च खेळी ठरली. सामनावीर पुरस्कार पटकवल्यावर हा पुरस्कार स्विकारताना मुंबईकर बॅटरनं नवरा-बायकोंमधील एक गोड गोष्ट शेअर केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नेमकं काय म्हणाला सूर्या भाऊ?
सामनावीर पुरस्कारा स्विकारताना हर्षा भोगले यांच्याशी संवाद साधताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, "माझी पत्नी म्हणाली होती की, यंदाच्या हंगामात 'मॅन ऑफ द मॅच' शिवाय मला सर्व पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे हा पुरस्कार माझ्यासाठी एकदम खास आहे. छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही दोघे मिळून सेलिब्रेट करत असतो. या गोष्टीचंही सेलिब्रेशन होईल."
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
बायकोसाठी कायपण...
सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी ही जोडीही चांगलीच लोकप्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघे एकमेकांवरील प्रेम दाखवून देत असतात. सूर्यकुमार यादवला चीअर करण्यासाठी देविशा प्रत्येक सामन्याला स्टेडियमवर हजेरी लावतानाही दिसून येते. आता सूर्यकुमार यादवनं थेट 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार तिच्यासाठी समर्पित केल्याचे दिसून आले.
यंदाच्या हंगामात सातत्यपूर्ण खेळी केली, पण...
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सूर्यकुमार यादवनं सर्वच्या सर्व सामन्यात २५ पेक्षा अधिक धावा करत आपल्या कामगिरीत सातत्य दाखवून दिले. आता तो वर्ल्ड विक्रम सेट करण्याच्या उंबरठ्यावर आहे. पहिल्या १२ सामन्यात बेस्ट स्ट्रायकर, सिक्सरसाठी अशा स्वरुपात त्याला वेगवेगळे पुरस्कार मिळाले. पण १३ व्या आणि प्लेऑफ्सचं तिकीट मिळवून देणाऱ्या सामन्यात त्याने यंदाच्या हंगामातील सर्वोच्च खेळी करत सामनावीर पुरस्कार पटकवला.