MI New Captain: अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष लागलेली आयपीएल २०२५ सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अशातच सर्व संघांचे कप्तान कोण असणार हे ठरलेले आहे, परंतू, पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कप्तान कोण असणार यावरून संभ्रम निर्माण झाला होता. रोहितला गेल्यावेळी बाजुला केल्याने क्रिकेट फॅन्समध्ये प्रचंड संताप होता. यामुळे हार्दिक पांड्या प्रचंड ट्रोलही झाला होता. यंदाच्या मोसमातील एमआयचा पहिल्या सामन्यातील कप्तान कोण यावरून पडदा हटला आहे.
नियमित कर्णधार हार्दिक पांड्या अनफिट आहे असे नाही, तर आयपीएलच्या एका नियमामुळे त्याला एका सामन्याची शिक्षा झाली आहे. यामुळे पांड्याच्या जागी रोहित कप्तानी करेल असे चाहत्यांना वाटले होते. परंतू. सीएसके विरुद्धच्या पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव हा एमआयचा कप्तान असणार आहे. हार्दिक पांड्यानेच याची घोषणा केली आहे.
मुंबईला आपला पहिला सामना २३ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध खेळणार आहे. हा सामना चेन्नईत होणार आहे. पांड्या मागच्या सीझनमधील कर्माची फळे या सिझनमध्ये भोगत आहे. स्लो ओव्हर रेटमुळे एका सामन्याची बंदी पांड्यावर घालण्यात आली आहे. यामुळे तो हा सामना खेळू शकणार नाही. मुंबई इंडियन्सच्या दुसऱ्या सामन्यापासून पांड्या पुन्हा कप्तान पदाची धुरा सांभाळणार आहे.
पांड्या आणि प्रशिक्षण महेला जयवर्धने यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी विचारलेल्या एका प्रश्नाला पांड्याने सुर्याचे नाव पुढे केले. सूर्या सध्या भारतीय टी-२० संघाचा कर्णधार आहे. अशा परिस्थितीत, माझ्या अनुपस्थितीत, तो यासाठी योग्य उमेदवार आहे, असे पांड्याने म्हटले आहे.
दोन वर्षांनी सुर्या पुन्हा...
सुर्यकुमार यादवने यापूर्वीही मुंबई इंडियन्सचे कप्तानपद सांभाळलेले आहे. २०२३ मध्ये आयपीएलवेळी सुर्याने कप्तान पद सांभाळले होते. ती मॅच मुंबईने जिंकली होती. रोहित कप्तान असूनही इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आला होता.