IPL 2025 MI vs CSK 38th Match Lokmat Player to Watch Will Jacks Mumbai Indians : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. अडथळ्यांतून मार्ग काढत अर्ध्या प्रवासात मुंबई इंडियन्सच्या संघाने आपल्या खात्यात ६ गुण जमा केले आहेत. उर्वरित ७ सामन्यात किमान ५ सामने जिंकून प्लेऑफ्सचं तिकीट पक्के करण्यासाठी ते प्रयत्नशील असतील. हे एक मोठं आव्हानच आहे. हे चॅलेंज समोर असताना 'विल' पॉवरमुळे मुंबई इंडियन्सला मोठा दिलासा मिळाला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाच सामन्यात अपयशी ठरल्यावर दाखवली ताकद
इंग्लिश क्रिकेटर विल जॅक्स पहिल्या ५ सामन्यात सातत्याने अपयशी ठरताना दिसला. पण सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याने बॅटिंग बॉलिंगमध्ये आपली ताकद दाखवली. हैदराबाद विरुद्ध त्याने दोन महत्वपूर्ण विकेट घेतल्यावर धावांचा पाठलाग करताना आश्वासक खेळीही करत संघाला विजय मिळून देण्यात मोलाचा वाटा उचलला. उर्वरित सामन्यात कामगिरीतील सातत्य राखून मुंबई इंडिन्सची नय्या पार करण्याची एक मोठी जबाबदारी त्याच्यावर असेल.
IPL 2025 : सतरावं वरीस मोक्याचं! युवा क्रिकेटरच्या 'विरार टू चेन्नई व्हाया मुंबई' प्रवासाची गोष्ट
विल जॅक्सची आयपीएलमधील आतापर्यंतची कामगिरी
मुंबई इंडियन्स आधी तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना दिसला होता. गत हंगामात आरसीबीकडून खेळताना त्याने ८ सामन्यात २३० धावा केल्या होत्या. यात नाबाद शतकाचा समावेश होता. यंदाच्या हंगामात ६ सामन्यात त्याने ९१ धावा केल्या आहेत. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात केलेली ३६ धावांची खेळी यंदाच्या हंगामातील त्याची सर्वोच्च खेळी आहे. याशिवाय त्याने ३ विकेट्सही घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. कामगिरीत सातत्य ठेवून तो कामगिरीत सुधारणा करण्यात यशस्वी ठरणार का ते पाहण्याजोगे असेल.
त्याच्यासाठी MI च्या संघानं मोजलीये मोठी किंमत
आरसीबीकडून खेळताना विल जॅक्सला दोन हंगामात प्रत्येकी ३ कोटी २० लाख एवढे पॅकेज मिळायचे. आयपीएलच्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सच्या संघाने या खेळाडूसाठी ५ कोटी २५ लाख रुपये खर्च केले आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघाप्रमाणेच त्यानेही यंदाच्या हंगामाची सुरुवात अडखळत केली. पण तो आता लयीत दिसतोय. त्याने आपला तोरा कामय ठेवला तर निश्चितच त्याचा संघाला फायदा होईल.