Tilak Varma Retired Out : आयपीएलमध्ये अशा पद्धतीने आउट होणारा चौथा फलंदाज ठरला तिलक वर्मा

आयपीएलमध्ये आतापर्यंत जे चार फलंदाज रिटायर्ड आउट झाले ते भारतीयच आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 01:08 IST2025-04-05T00:59:55+5:302025-04-05T01:08:38+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 LSG vs MI Tilak Varma Becomes Fourth Player To Be Retired Out In IPL History See Record | Tilak Varma Retired Out : आयपीएलमध्ये अशा पद्धतीने आउट होणारा चौथा फलंदाज ठरला तिलक वर्मा

Tilak Varma Retired Out : आयपीएलमध्ये अशा पद्धतीने आउट होणारा चौथा फलंदाज ठरला तिलक वर्मा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 LSG vs MI,  Tilak Varma Retired Out : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील १६ वा सामना लखनौच्या इकान स्टेडियमवर खेळवण्यात आला.  घरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जाएंट्स संघानं मुंबई इंडियन्स विरुद्ध १२ धावांनी विजय नोंदवला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील तिलक वर्मासंदर्भात घेण्यात आलेला निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. लखनौ विरुद्धच्या सामन्यात २३ चेंडूत २ चौकाराच्या मदतीने २५ धावा करणाऱ्या तिलक वर्माला  ७ चेंडू शिल्लक असताना बाहेर बोलवण्याचा निर्णय मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून घेण्यात आला. तिलक वर्मा 'रिटायर्ड आउट' झाला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

IPL मध्ये 'रिटायर्ड आउट' होणारा चौथा फलंदाज ठरला तिलक

तिलक वर्मासंदर्भातील निर्णयाचा संघाला तसा काहीच फायदा झाला नाही. शेवटी मुंबई इंडियन्सच्या पदरी निराशाच आली. पण युवा बॅटरवर मात्र नामुष्की ओढावली. आयपीएलच्या इतिहासात अशा पद्धतीने रिटायर्ड आउट होणारा तो चौथा फलंदाज ठरला. रविचंद्रन अश्विन हा आयपीएलच्या इतिहासात रिटायर्ड आउट होणारा पहिला फलंदाज आहे. २०२२ च्या हंगामात त्याच्यावर ही वेळ आली होती. याशिवाय २०२३ च्या हंगामात अथर्व तायडे आणि साई सुदर्शन हे फलंदाजही रिटायर्ड आउट झाल्याचे पाहायला मिळाले होते. 

LSG साठी आवेश खान ठरला हिरो! सूर्याची कडक फिफ्टी व्यर्थ; MI ला पांड्याचा आत्मविश्वास नडला?

MI चा हा निर्णय चुकीचा; कारण मिचेल सँटनर म्हणजे काही पोलार्ड नव्हता

तिलक वर्माची जागा घेण्यासाठी पोलार्डच्या धाटणीत खेळण्याचा पर्याय संघात असेल त्या परिस्थितीत हा निर्णय कदाचित योग्य वाटला असता. पण मिचेल सँटनर म्हणजे काही पोलार्ड नाही. हा पर्याय आजमावण्यासाठी तिलक वर्माला बाहेर बोलावणं चुकीचेच वाटते. जो बॅटर २३ चेंडू खेळलाय तो एखादा फटका मारेल, हा विश्वास कॅप्टन आणि टीमनं दाखवला नाही ते आश्चर्यचकित करणारे  होते. 

या निर्णयावर काय म्हणाला हार्दिक पांड्या?

सामन्यानंतर तिलक वर्मासंदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दल हार्दिक पांड्या म्हणाला की, आम्हाला त्या क्षणी मोठ्या फटकेबाजीची गरज होती. त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत नव्हते. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. बऱ्याचदा तुम्ही प्रयत्न करूनही मोठी फटकेबाजी करणं शक्य होत नाही, असे हार्दिक पांड्या यावेळी म्हणाला. आता गंमत ही की, अखेरच्या  षटकात पांड्यानं षटकार मारला . पण  अन्य चेंडूवर तोही फुसका बारच ठरला. यातून एक गोष्ट  स्पष्ट होते, की LSG च्या संघातील गोलंदाजी चांगली गोलंदाजी केली. बाकी जो ड्रामा झाला तो निर्थकच.

Web Title: IPL 2025 LSG vs MI Tilak Varma Becomes Fourth Player To Be Retired Out In IPL History See Record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.