IPL 2025 : आयपीएलच्या इतिहासात SRH वर पहिल्यांदाच आली ही वेळ! KKR नं साधला मोठा डाव

सनरायझर्स हैदराबादच्या संघाला ८० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 23:50 IST2025-04-03T23:45:48+5:302025-04-03T23:50:08+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 KKR vs SRH Kolkata Knight Riders won by 80 runs Biggest Defeat Margins For Sunrisers Hyderabad In IPL History | IPL 2025 : आयपीएलच्या इतिहासात SRH वर पहिल्यांदाच आली ही वेळ! KKR नं साधला मोठा डाव

IPL 2025 : आयपीएलच्या इतिहासात SRH वर पहिल्यांदाच आली ही वेळ! KKR नं साधला मोठा डाव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 KKR vs SRH 15th Match : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने घरच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्धचा आपला दबदबा कायम राखत दिमाखदार विजय नोंदवला. दुसऱ्या बाजूला सनरायझर्स हैदराबादच्या संघाला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की ओढावली आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ बाद २०० धावा करत हैदराबादच्या संघासमोर २०१ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना मजबूत बॅटिंग ऑर्डर असणारा हैदराबादचा संघ १६.४ षटकात १२० धावांत आटोपला.  कोलकाता नाईट रायडर्सनं  ८० धावांनी सामना जिंकला. या पराभवासह हैदराबादच्या संघावर सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की ओढावली.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

मोठ्या फरकाने पराभूत होण्याची नामुष्की 

याआधी गत हंगामात सनरायझर्स हैदराबाद  संघाला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात ७८ धावांनी पराभवाची नामुष्की ओढावली होती. आता कोलकाताच्या संघाविरुद्ध त्यांच्यावर ८० धावांनी पराभूत होण्याची वेळ आली आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सनरायझर्स हैदराहबादचा हा सर्वात मोठा पराभव आहे. 

IPL 2025 : Kamindu Mendis नं दोन्ही हातांनी गोलंदाजी करण्याचं कसब दाखवलं; अन् विकेटही घेतली (VIDEO)
 
आयपीएलमध्ये SRH  संघाचा सर्वाधिक धावांनी पराभूत होण्याचा रेकॉर्ड
 

  • ८० धावा विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, कोलकाता, २०२५*
  • ७८ धावा विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज,चेन्नई,२०२४
  • ७७ धावा विरुद्ध  चेन्नई सुपर किंग्ज, हैदराबाद, २०१३
  • ७२ धावा विरुद्ध  राजस्थान रॉयल्स, हैदराबाद, २०२३
  • ७२ धावा विरुद्ध पंजाब किंग्ज, शारजाह, २०१४

कोलकाताच्या संघानं साधला मोठा डाव

आयपीएलमध्ये सनरायझर्स विरुद्ध सलग पाच विजय मिळवण्याचा खास रेकॉर्ड कोलकाता नाईट रायडर्सच्या नावे झाला आहे. कोलकाताशिवाय २०२० ते २३ या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं सलग पाच वेळा सनरायझर्स हैदराबादला पराभवाचा धक्का दिल्याचे पाहायला मिळाले आहे. आता केकेआरनं दिल्ली कॅपिटल्सची बरोबरी करत हैदराबादला सलग पाचव्यांदा पराभूत करून दाखवले आहे.

Web Title: IPL 2025 KKR vs SRH Kolkata Knight Riders won by 80 runs Biggest Defeat Margins For Sunrisers Hyderabad In IPL History

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.