Join us

IPL 2025 KKR vs GT : रिंकूचा जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)

एका अप्रतिम कॅचसह रिंकूनं GT च्या कॅप्टनच्या दमदार इनिंगला ब्रेक लावला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 22:10 IST

Open in App

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल याने ईडन गार्डन्सच्या मैदानात दमदार खेळी केली. सलामीवीर साई सुदर्शनच्या साथीनं शतकी भागीदारी केल्यावर शुबमन गिलही शतकाच्या दिशेने वाटचाल करताना दिसले. पण रिंकू सिंह त्याच्या शतकाच्या आड आला. एका अप्रतिम कॅचसह रिंकूनं GT च्या कॅप्टनच्या दमदार इनिंगला ब्रेक लावला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

अर्धशतकी खेळीनंतर गियर बदलून पकडला वेग, पण...

कोलकाताच्या मैदानात साई सुदर्शनसोबत त्याने पहिल्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी रचली. ३४ चेंडूत अर्धशतक झळकावल्यावर त्याने गियर बदलून मोठी फटकेबाजी करण्याला सुरुवात केली. १८ व्या षटकात शुबमन गिल नव्वदीच्या घरात पोहचला होता. यंदाच्या हंगामातील पहिले शतक तो अगदी सहज करेल, असाे वाटत होते. पण वैभव अरोराच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला.

IPL 2025 : 'सरकारी नोकरी' मागे न धावता तो क्रिकेटमध्ये रमला; गाववाल्यांचाही आता 'दृष्टिकोन' बदलला!

रिंकू सिंहचा अप्रतिम कॅच 

गुजरात टायटन्सच्या डावातील १८ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर वैभव अरोराने टाकलेल्या लो फुलटॉस चेंडूवर शुबमन गिलनं मिड विकेटच्या दिशेने मोठा फटका मारला. रिंकू सिंह याने धावत येत एक अप्रतिम झेल टिपला अन् शुबमन गिलला तंबूत परतावे लागले. एका बाजूला शुबमनची सेंच्युरी मिस झाली. दुसरीकडे कॅच घेतल्यावर रिंकू सिंहने चेंडूला किस करत या विकेटचे सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले.  शुबमन गिलनं ५५ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ९० धावांची खेळी केली. 

गुजरात टायटन्सने धावफलकावर लावल्या  १९८ धावा

शुबमन गिलच्या दमदार खेळीसह सलामीवीर साई सुदर्शन याने ३६ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५२ धावांची खेळी केली. जोस बटलरने २३ चेंडूत केलेल्या ४१ धावांच्या खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ३ विकेट्सच्या मोबदल्यात १९८ धावा केल्याचे पाहायला मिळाले. केकेआरकडून वैभव अरोराशिवाय आंद्रे रसेल याने एक विकेट घेतली.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५गुजरात टायटन्सकोलकाता नाईट रायडर्सशुभमन गिलरिंकू सिंगइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट